Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ मे, २०२४

साक्री तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना यांच्याकडून ऍड गोवाल पाडवी यांना जाहीर पाठिंबा



  महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांची विसरवाडी येथे  प्रचार सभा असताना नाना पटोले आणि ऍड गोवाल पाडवी यांच्या हस्ते प्रहार च्या पाठिंब्याचे पत्र स्वीकारण्यात आले तसेच साक्री तालुक्याचे महाविकास आघाडीचे नेते मा.बापूसाहेब चौरे, मा.भानुदास गांगुर्डे, मा. उत्तमराव देसले, मा.जितेंद्र मराठे, मा.गणपतजी चौरे, मा. विश्वास भाऊ बागुल,कपिल जाधव यांच्या नेतृत्वात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री गोवाल पाडवी यांना येणाऱ्या 13 तारखेच्या निवडणुकीत ३८२१ बुथ कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. 
 नंदुरबार लोकसभेच्या एकंदरीतच विकासाच्या दृष्टिकोनातून बघता साक्री विधानसभा ही नंदुरबार लोकसभेमध्ये येत असल्याकारणाने नंदुरबार बरोबर साक्री तालुक्याचा विकास व्हावा त्याचप्रमाणे साक्री तालुक्याच्या शेतकरी, शेतमजूर, शोषित, वंचित, पीडित यांना योग्य प्रकारे न्याय मिळावा आणि दिव्यांग बांधवांना तारखेनुसार पगार, पगारात वाड करावी तसेच दिव्यांगांवर दरवर्षी प्रस्तावित खर्चातून पन्नास लाख रुपये खर्च करावे तसेच साक्री तालुक्यातच आदिवासीं प्रकल्प योजेंनेंचे कार्यालय उभारावे जे ने करून साक्री तालुक्यातील जास्तीतजास्त आदिवासीं समाजाला योजनांचा लाभ देता येईल तसेच साक्री ग्रामीण रुग्णालय व पिंपळनेर ग्रामीण रुग्णालय येथे एम.आर.आय, सिटीस् स्कॅन, सोनोग्राफी ची व्यवस्था तसेच सुशिक्षीत बेरोजगार यांच्यासाठी साक्री तालुक्यात एम्.आय.डी.सी, उपलब्ध करावा साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात विचार करावा, विद्यार्थ्यांना अतिरिक्त फी कमीतकमी करून स्कॉलरशिप वाडवावी तसेच स्पर्धा परीक्षा केंद्र हे दुसऱ्या विभागात न ठेवता ज्याच्या त्याच्या जिल्ह्यातच असावे या सगळ्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर नंदूरबार लोकसभेचे तरुण तडफदार मतदार संघातील मतदारांचे लाडके विजयी उमेदवार ऍड गोवाल पाडवी यांना पाठिंबा दर्शविला आहे प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेच्या साक्री तालुक्यात एकूण 28 शाखा आहेत काँग्रेस च्या उमेदवाराला प्रहार च्या पाठिंब्याचा जास्तीत जास्त फायदा आणि भाजप उमेदवाराला जास्तीत जास्त सामना करण्याची वेळ आली आहे तसेच डॉ हिना ताई गावित यांच्यावर साक्री तालुक्यातील शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार, बेरोजगारी,माहागाई व्यापारी वर्ग, सर्व सामान्य जनता प्रचंड नाराज आहे म्हनून      
'बिन मांगे मोती मिले,मांगे मिले ना भीख' ऍड गोवाल दादा पाडवी यांना न मागंता मतदान मिळणार आहे आणि डॉ हिना ताई गावित यांनी प्रचंड पैसा खर्च करून पण मतदार त्यांच्या झोळीत मतदान टाकणार नाही अशी परिस्थिती निर्माण यावेळी झाली आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा, संघटनेचे तालुकध्यक्ष संजय पाटील,उप तालुकाध्यक्ष नाना शेलार,तालुका संघटक महेश नांद्रे, साक्री शहर अध्यक्ष राहुल नांद्रे, विनोद साळुंखे राजेंद्र कोरडकर हारून मण्यार, एम एन शिंदे ई उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध