Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ मे, २०२४

शिरपूर येथे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची 8 मे रोजी जाहिर सभा



शिरपूर प्रतिनिधी : येथे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची 8 मे बुधवार रोजी जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पंचवार्षिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवार डॉ.हिनाताई विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा 8 मे 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता आर.सी.पटेल फार्मसी ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उमेदवार खा. डॉ.हिनाताई गावित, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व अनेक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, शिरपूर विधानसभा प्रभारी हेमंत पाटील, शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख के.डी.पाटील, सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध