Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ जून, २०२४

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया



- निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते.
- मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाखांहून अधिक मते मिळाली.
- संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोट बोला रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. 
- मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले. 
- मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे.  
- पराभवाची कारणमिमांसा केली जाईल. 
- गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले.
- या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहे. 
- देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. 
- अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही.
- जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. 
- आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. 
- विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. 
- मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध