Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ६ जून, २०२४

सत्यशोधक सामाजिक फाऊंडेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार राजु साळुंके यांना प्रदान...!



संस्थापक अध्यक्ष राजु साळुंके यांना सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन, सर्च फाउंडेशन आणि युवा प्रबोधन साहित्य मंच यांच्यातर्फे 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२०२४' देण्यात आला. अमृतकर यांना मिळालेला हा ७२ वा पुरस्कार ठरला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात २ जून रोजी पार पडला. विठ्ठल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुजाता गुरव, महिला व बालविकास अधिकारी सचिन राख, अभिनेत्री केतकी गावडे, रिल्स स्टार रश्मी सोनोने, अभिनेता बाळराजे वाळुजकर, गोल्डमॅन दिलीप खरात, सिने अभिनेता रिषभ पडोळे, लावणणी नृत्यांगणा काव्या मुंबईकर, नृत्यांगणा सायली पुणेकरल सचिन हळदे, रितेश वाघमारे, हनुमंत हरणे, व्याख्याते तथा प्रबोधनकार सागर वाघमारे, सर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली मेश्राम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले, असे जोगेश्वरी गीतगायन मंडळाचे
अध्यक्ष संजय अमृतकर, बहादरपूरकर यांनी कळविले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध