Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० जून, २०२४

महाराष्ट्र ग्रामीण बँक प्रायोजित महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा...


परंडा(राहूल शिंदे) दि.१० शेतकरी वर्गाला पिक कर्ज नूतनीकरण, व्याज परतावा तसेच शासनाच्या प्रोत्साहनपर योजनेचे महत्व पटवून सांगण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचे दि. ५ जून ते १५ जून दरम्यान आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५० ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार असून या दरम्यान तब्बल २००० नियमित पिक कर्ज धारकांचा सत्कार तसेच संपूर्ण यात्रेदरम्यान २००० झाडांचे वृक्षारोपण देखील बँकेमार्फत करण्यात येणार आहे. अशी माहिती शाखा व्यवस्थापक तुषार माने यांनी दिली. ही यात्रा दि. १२ जून रोजी आनाळा येथे येणार असून त्या दरम्यान एटीएम मशीनचे प्रात्यक्षिक तसेच आर्थिक समावेशन, डिजिटल साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनाबद्दल जनजागृती करण्याचे काम देखील बँकेमार्फत करण्यात येईल.

बँकेचे सर्व सन्माननीय ग्राहक, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, बचत गटातील महिलावर्ग तसेच संबंधित शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी आनाळा येथे येणाऱ्या महाग्रामीण नावाचेतना संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सामील होण्याचे व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँके मार्फत करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध