Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ जून, २०२४

साक्री तालुक्यातील दिघावे येथील तुर गवार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला अनधिकृत वालपापडी बियाणे विकणे भोवले... कृषी अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल



साक्री प्रतिनिधी :- मा.श्री.मोहन वाघसाहेब, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग,नाशिक तसेच मा.कैलास शिरसाट,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धुळे आणि श्रीमती कावेरी राजपूत, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद,धुळे यांचे मार्गदर्शनाखाली दिघावे तालुका साक्री जिल्हा धुळे येथे विनापरवाना बियाणे विक्री प्रकरणी मे.पालीवाल सोहम सीड्स कंपनी,अहमदाबाद उत्पादित वालपापडी (Bean) वाण Paliwal S-5 ची 25 पाकिटे बियाणे जप्त करण्यात आली असून सदर बियाण्याचे मूल्य रुपये 26250 आहे.

काल दिनांक 11 जून 2024 रोजी जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विनापरवाना वाल पापडीचे बियाणे विक्री प्रकरणी मौजे दिघावे येथील इसम अजय शांताराम दसपुते आणि बियाणे उत्पादक कंपनी यांचे विरुद्ध साक्रि,पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 0212/2024 दिनांक 11/06/2024 अन्वये बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती, साक्रि श्री.रमेश महादेव नेतनराव यांनी गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईसाठी श्री प्रदीपकुमार निकम,मोहीम अधिकारी,जिल्हा परिषद,धुळे,श्री राजेश कुमार चौधरी,
कृषी अधिकारी पंचायत समिती,
शिरपूर,श्री शिरीषकुमार कोकणी,कृषी अधिकारी पंचायत समिती, साक्री,
पोलीस कॉन्स्टेबल चेतन रमेश आढारे यांनी परिश्रम घेतले.नाशिक विभागात पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध असून शेतकरी बांधवांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे तसेच बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्यावे असे आवाहन मा.मोहन वाघ,विभागीय कृषी सहसंचालक ,नाशिक विभाग,नाशिक यांनी केले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध