Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ जून, २०२४

बोरगांव येथे मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे परसबाग लागवड



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे माजी खासदार स्व मुकेशभाई पटेल यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला 'स्व मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व अस्तित्व फॉऊंडेशन' तर्फे 'माँ गंगा परसबाग मंडल' या उपक्रमांतर्गत सेंद्रीय भाजीपाल्याची परसबाग तयार करण्यात आली असून त्यात 24 प्रकारच्या सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड करण्याचा शुभारंभ आमदार श्री काशिरामदादा पावरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तसेच गावात आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

उत्तम आरोग्य व स्वस्थ जीवनासाठी आपल्या दैनंदिन आहारात सेंद्रीय भाजीपाला असावा यासाठी माजी शिक्षणमंत्री श्री अमरीशभाई पटेल व प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन श्री भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कु द्वेता भुपेशभाई पटेल यांनी पुढाकार घेतलेला आहे. 

जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व सेंद्रीय भाजीपाला लागवड करावा या हेतूने आदिवासी भाग, शिरपूर शहरानंतर ग्रामीण भागात देखील हा उपक्रम राबविला जात आहे. बोरगांव येथे सुद्धा सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या प्रयत्नांनी या उपक्रमाची सुरूवात झालेली आहे. 

यावेळी पं स माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, कृउबा संचालक मिलिंद पाटील, बी डी सिसोदिया सर, गुलझारसिंग राजपूत, दीपक सोयराभाऊ राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, मा चेअरमन रजेसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, माजी पोलीस पाटील जयसिंग लकडू राजपूत, छोटुभाऊ सोनार, जातोडा माजी सरपंच जयसिंग राणा, दगा बुधा महाजन, सुभाष न्हावी, रविंद्र निकुम, राजेंद्र निकुम जातोडा, गुलाब फुला भिल, बाबुराव बोरगावकर, धिरज देशमुख, पत्रकार महेंद्र माळी, आमदार स्वीय सहाय्यक सचिन माळी, परसबाग मेकर रोहित पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध