Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
बोगस शालार्थ आयडी रॅकेटचा भंडाफोड; शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींसह ९ जणांना अटक धुळे–चोपड्यातील आरोपींचाही समावेश; कोट्यवधींचा घोटाळा उघड
बोगस शालार्थ आयडी रॅकेटचा भंडाफोड; शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींसह ९ जणांना अटक धुळे–चोपड्यातील आरोपींचाही समावेश; कोट्यवधींचा घोटाळा उघड
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर संगनमत, दस्तऐवजांमध्ये केलेली हेराफेरी आणि कोट्यवधींचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. या घोटाळ्यात शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींसह एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली असून धुळे व चोपड्यातील संशयितांचाही समावेश आहे.
कसे उघड झाले रॅकेट?
संस्थाचालक, शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि उपसंचालक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी एकत्रित संगनमत करून बोगस शालार्थ आयडी तयार केले.
या आयडींच्या मदतीने —
शेकडो तरुणांना बनावट नोकऱ्या दाखवल्या
मागील तारखांचे पगार बिल तयार करून कोट्यवधी रुपये काढले संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनी प्रचंड आर्थिक लाभ लाटल्याचे उघड
पोलीस तपासात धक्कादायक माहिती
या प्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासात समोर आले की, त्या वेळीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनीही काही आरोपी—शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील—यांच्यासोबत संगनमत करून आवक-जावक रजिस्टरमध्ये फेरफार केली. या गंभीर भूमिकेमुळे गिरी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
ज्या आरोपींना अटक
मनोज रामचंद्र पाटील (रा. धुळे)
नीलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा, जळगाव)
दत्तात्रय दयाराम पाटील
यांच्यासह एकूण ९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इतर काही संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
SITची स्वतंत्र चौकशी सुरू
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विशेष एसआयटी नेमण्यात आली असून जिल्ह्यातील विविध शिक्षणसंस्थांना प्रत्यक्ष भेटी देत कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. अनेक संस्थांचे कर्ताधर्ते आता चौकशीच्या कचाट्यात सापडले आहेत.
या रॅकेटमुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून तपासाचा वेग पाहता अजूनही काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा