Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ जून, २०२४




शिरपूर न्यायालयात योग दिन साजरा
शिरपुर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिवाणी न्यायालय शिरपुर, तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ शिरपुर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयाच्या आवारात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
योग शिक्षक संजय भास्कर चौधरी यांनी योग अभ्यासाचे प्रशिक्षण देऊन योग अभ्यासाचे मानवी जीवनात होणारे फायदे व महत्व सांगितले. 

यावेळी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आर.आर.भद्रे , सहदिवाणी न्यायाधीश पी.पी.जोशी, वकिल संघाचे सचिव, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी योग अभ्यासाचे प्रशिक्षण घेतले.  सहकारी योग शिक्षक रविंद्र पाटील उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध