Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ जून, २०२४
Home
/
Unlabelled
/
विरगाव येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दाखले वाटप...
विरगाव येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दाखले वाटप...
चोपडा प्रतिनिधी : महाराजस्व अभियानांतर्गत चोपडा तालुक्यातील आडगाव मंडळातील विरगाव येथील विद्याभारती विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले.तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यातील विरगाव येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शासकीय शुल्कात दाखले काढून दिले. दहावीच्या व बारावीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते.आवश्यक दाखले शालेयस्तरावर उपलब्ध व्हावेत याबाबत मंडळ अधिकारी व्ही.पी.पाटील यांनी मुख्याध्यापकांना व तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र संचालकांना सूचना दिल्या.
तालुक्यात आडगाव मंडळामध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.मंडळ अधिकारी व्ही.पी.पाटील यांनी दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.याप्रसंगी मुख्याध्यापक एस.एल.पाटील,तलाठी दीपाली ईशी,महेंद्र पाटील,श्रीमती.एच.एम पाटील,एम.के.बारेला,कोतवाल तुकाराम बारेला आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.बी.जाधव, यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा