Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ जून, २०२४

बोराडी गोट फार्म मालकांचे लाखो रुपये किमतीचे बोकड घेऊन खाटीक झाला गायब तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल



शिरपूर प्रतिनिधी:- बोराडी गोट फार्म मालकांचे लाखो रुपये किमतीचे बोकड घेऊन व्यापाऱ्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात दिनेशकुमार राजाराम खाटीक (वय ५०) व त्याची मुले करण व अर्जुन खाटीक (रा.बबरपूर, जि. काल्पी, उत्तर प्रदेश, ह.मु.आमोदे ता. शिरपूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरपूर तालुका परिसरातील ग्रामीण भागातून गेल्या वीस वर्षांपासून बकरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते राज्यस्थान येथून बकऱ्याची लहान पिले आणून ते गोट फार्म चालकांना मोठे करण्यासाठी देत होते. मागील पाच वर्षांपासून बोराडी येथील समाधान प्रकाश पवार हे त्यांच्याशी व्यवहार करीत.

सुत्रांच्या नुसार बकरी ईदच्या अनुषंगाने पवार यांच्या बोराडी येथील गोट फार्ममध्ये पालनपोषण करून मोठे केलेले बोकड ते खाटीक यांना विकायचे. यंदा बकरी ईदच्या अनुषंगाने (ता.१४) जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास दिनेशकुमार खाटीक, अर्जुन दिनेशकुमार खाटीक, करण दिनेशकुमार खाटीक व सोबत अजून एक अज्ञात असे पवार यांच्या बोराडी येथील गोट फॉर्म येथे येऊन वीस हजार रुपये प्रति बोकड प्रमाणे अंदाजे १६५ बोकड अंदाजे एकूण ३३ लाख रुपये किमतीचे घेऊन गेले. नेहमीप्रमाणे बकरी ईद झाल्यावर दोन-तीन दिवसांत बोकडचे पैसे देतो सांगून गेले. पवार यांनी खाटीक यास (ता. १९) रोजी बोकडचे पैसे मागण्यासाठी मोबाईलवर कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद येते होता. त्यानंतर पवार यांच्या सोबत इतर गोट फार्मचे मालक त्यांचे साई गोट फॉर्म (आमोदे शिवार) व ते राहत असलेल्या आमोदे गावी गेले.

मात्र घरही बंद होते. पवार यांच्यासोबत आजूबाजूच्या खेड्यातून खाटीक यांनी जवळपास १७२ लोकांकडून सुमारे ७८० बोकड घेऊन गायब झाला आहे. यामुळे खाटीक यांनी फसवणूक केल्याने पवार यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध