अमळनेर i उपसंपादक– शामकांत पाटील
जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत तब्बल ५२३ कोटी २८ लक्ष रक्कम मंजूर झाली .त्यात अमळनेर तालुक्यात ५५ हजार ८२४ शेतकऱ्यांसाठी ३६ कोटी १० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांना ३६ कोटी १० लक्ष रुपयांचा लाभ मिळाला .पण त्याचा श्रेयवाद तालुक्यात सुरु आहे. पीकविमा मिळण्यासाठी सुभाष पाटील यांनी ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीच्या दालनात तक्रार अर्ज केले होते व त्यानुसार संबधित अधिकारी यांनी अपिल कामी शेतकऱ्यांना न बोलवता तसा अहवाल दिल्ली दरबारी पाठवण्याच्या प्रयत्न केला होता. त्याविरोधात नागपूर कार्यालयात जावून सुभाष पाटील यांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान पिळले होते.
शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी सुभाष पाटील यांच्या टीमने पुरेपूर प्रयत्न केले होते हे जरी खरे असले तरी पिक विम्याच्या लाभ अमळनेर तालुक्याचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय यांच्यामुळेच मिळाला असा गाजावाजा कार्यकर्ते करत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाल्याने श्रेयवाद सुरु झाला आहे. जनता मात्र पिक विम्याचे पैसे कुणामुळे मिळालेत हे जाणून आहे .
पंतप्रधान पिक विमा योजना ही भारत सरकारने सुरु केलेली प्रमुख कृषी योजना आहे. PMFBY चे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे आणि नैसर्गिक आपत्ती,किटक किंवा रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास जोखीम कमी करणे हेच आहे. तथापि यात देखील मोठा भ्रष्टाचार व गैरकारभार सुरु आहे. यापूर्वी जनता विमा काढत नसल्याने पिक विमा पद्धत नामशेष होण्याच्या मार्गावर असताना एक रुपयात विमा ही संकल्पना नव्याने सुरु करण्यात आली. यामागचे गोडबंगाल काही वेगळेच आहे विमा कंपन्या अधिकारी व पुढारी यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवण्याचे काम करतात व संगनमताने शेतकऱ्यांचाच १००% पैसा त्यांना ३०% परतावा देवून ७०% लुटला जातो.पीकविमा शेतकऱ्यांचा व भांडवल राजकारण्यांचे अशीच अवस्था झाली आहे मग ते आर्थिक असो अथवा प्रसिद्धीचे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा