Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ जुलै, २०२४

मंत्री अनिल पाटील यांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करावी : माजी नगरसेवक श्याम पाटील



अमळनेर i उपसंपादकशामकांत पाटील    

 

अमळनेर तालुक्यातील शासकीय कार्यालयात लाडकी बहिण योजनेच्या  भरल्या जाणाऱ्या अर्जाच्या पुढच्या पानावर  मंत्री अनिल पाटील याचे फोटो असल्याने शरद पवार गटाचे माजी नगरसेवक शाम पाटील यांनी हरकत घेतली आहे. लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून त्या योजनेच्या माध्यमातून शासकीय कार्यालयात चालणाऱ्या कामकाजात मंत्री महोदय हे स्वतःचा फोटो असलेले टोकन अर्जासोबत जोडून तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत  आहेत  .

 

 मंत्री  अनिल पाटील यांनी तालुक्यातील महिला यांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करण्यासाठी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांमार्फत स्वतंत्र यंत्रणा पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट असे नियोजन करून स्वतःचे मोठे  होर्डिंग लावून प्रत्यक्ष गावोगावी जनतेला अर्ज भरण्याकामी मदत करणे अपेक्षित असतांना सरकारी यंत्रणेवर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न तालुक्यातील जनतेला देखील पटलेला नाही.अमळनेर तालुक्याच्या शेजारी असलेल्या शिरपूर तालुक्यात माजी आमदार अमरीशभाई पटेल यांचे कार्यकर्ते स्वतः गावोगावी जावून लाडकी बहीण योजनेचे फार्म भरून घेत आहेत.

 

संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी स्वतः स्वखर्चाने योजनेचे काम करत असतांना , अमळनेर तालुक्यात मात्र लोकप्रतिनिधीची ही उदासीनता व त्यात आवाज उठवणाऱ्या समाज सेवकांना  धमकविन्याची पद्धत  निश्चितच साने गुरुजींच्या पुण्य भुमीत निंदाजनक आहे.मंत्री महोदय यांनी अत्यआधुनिक सुविधायुक्त मोबाईल वहान (गाडी) गावोगावी फिरवून जनतेला अर्ज भरण्यास मदत करणे गरजेचे आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध