Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० जुलै, २०२४

एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालय शिंदखेडा येथे करिअर कट्टाच्या संसदेची स्थापना




श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा येथे विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली.

महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या करिअर संसदेची स्थापना करण्यात आली. सदर संसदेअंतर्गत मुख्यमंत्री म्हणून मोहिनी साळुंखे, नियोजन मंत्री - रोशनी महाजन, कायदे व शिस्तपालन मंत्री - गौरव पाटील, सामान्य प्रशासन मंत्री - कोमल माळी, माहिती व प्रसारण मंत्री - रेणुका गिरासे, उद्योजकता विकास मंत्री - हर्षिता बैसाणे, रोजगार स्वयंरोजगार मंत्री - पवन अहिरे, कौशल्य विकास मंत्री - रोहिणी देशमुख, संसदीय कामकाज मंत्री - सुमित अधिकार व सदस्य पदी साक्षी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

विद्यार्थी संसदेच्या स्थापनेवेळी महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारणीचे अध्यक्ष माननीय प्रफुल्लकुमारजी सिसोदे, उपाध्यक्ष माननीय अशोकजी पाटील व संचालक माननीय प्रा. सुरेशजी देसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. एन. एस. पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार, कर्तव्य व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. करिअर कट्टाचे तालुका समन्वयक प्रा. जितेंद्र पाटील यांनी विद्यार्थी संसदेचे महत्त्व विशद केले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.बोरसे व उपप्राचार्य डॉ.व्ही. एस.पवार तसेच प्रा.आर.आर.पाटील व करियर कट्टा समन्वयक प्रा.स्वप्निल गांगुर्डे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध