Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ जुलै, २०२४

दहिवद येथील नव्याने तयार झालेल्या जिल्हा परिषद डांबरी रस्त्यात दोन महिन्यातच खड्डे



शामकांत पाटील (उपसंपादक) 
अमळनेर : ग्रामीण रस्ते हे गावातील जनतेच्या विकासाचा कणा असतात. दळण वळणाचे साधन व्यवस्थित नसले तर गावाची प्रगती थांबते.दहिवद फाट्यापासून दहिवदकडे जाणारा रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने निधी अभावी बरेच वर्ष रस्त्याची दुरावस्था राहिली. दहा ते बारा वर्षे गावातील जनतेला तारेवरची  कसरत करावी लागली.२०२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात काम सुरू झाले. यावेळी रस्ता चांगल्या गुणवत्तेचा  अंदाजपत्रकानुसार होईल अशी अपेक्षा जनतेला होती. ठेकेदार जैन यांनी मात्र रस्त्याचे डांबर खाऊन रस्ता अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार न करता रस्त्याच्या कामात गैरकारभार केला.रस्त्यात फक्त तीन महिन्यातच खड्डे पडले ते देखील ठेकेदार जैन यांनी तडकाफडकी पडत्या पाऊसात ठिगळ लावून बुजून टाकले. तरी खड्डे पडणे अजूनही थांबत नसल्याने याच पाऊसात रस्त्याचे तीन- तेरा झाल्याशिवाय राहणार नाहीत असे चित्र आहे.रस्त्याचे डांबर डोळ्याला दिसत नसून डांबर विरहीत खडी नजरेस येत आहे.रस्त्याच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाला असून रस्त्यावरील डांबर गेले कुठे ? असा सवाल जनतेत निर्माण झाला आहे. 


दहिवद गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांनी जिल्हा परिषद उपअभियंता खैरनार व तांत्रिक अधिकारी बोरसे यांना कामाच्या ठिकाणी समक्ष बोलवून  रस्ताचे काम योग्य होत नसून निकृष्ठ होत असल्याचे लक्षात आणून दिले होते.जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दोन्ही अधिकारी यांनी रस्त्याचे काम योग्यच होईल असे आश्वासन देवून काम सुरू केले.आज मात्र तीन महिन्यातच रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून रस्त्याचे काम  निकृष्ठ झाले आहे, हे जनतेला दिसून आले आहे.निकृष्ट कामामुळे ग्रामीण रस्त्याची दुरावस्था होवून जनतेचा पैसा हा ठेकेदार, इंजिनियर यांच्या खिश्यात तर जात नाही ? निकृष्ठ दर्जाचे व गुणवत्ताहिन काम होत असतांना देखिल गटविकास अधिकारी ,जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गप्प का ? यामागे काही आर्थिक कारण तर दडल नसेल ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात व त्यांची उत्तरे राजकिय हस्तेक्षपामुळे अनुत्तरीत राहतात. 
 
रस्ते निर्मिती कामात होत असलेल्या निकृष्ट साहित्याच्या वापराबाबत संबधित ठेकेदारला जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाने मनाई का केली नाही ? मनाई न करण्यामागे संबधित अधिकारी यांचे काही आर्थिक  हित संबध तर नसतील ? असा सवाल दहिवद येथील जनतेच्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे.या गंभीर प्रश्नावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अमळनेर येथील अधिकारी, कर्मचारी यांना केव्हा जाग येईल हे येणारा काळ व वेळच ठरवेल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध