Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ जुलै, २०२४

शिक्षण संस्थेचा अजब गजब कारभार बोगस शिक्षकास मुख्याध्यापक केले कसे ?

शिरपूर प्रतिनिधी :- शिक्षण संस्थेचा अजब कारभार सर्वात पवित्र समजला जाणाऱ्या शिक्षण क्षेत्राला फासला काळिमा,शिरपूर तालुक्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार एका प्रतिष्टीत शिक्षण संस्थेचा अजब कारभार बोगस शिक्षकास केले मुख्याध्यापक, बेटावद येथील जनता शिक्षण प्रसारक संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक....... यांची प्रथम शिक्षक मान्यता हिच बेकायदेशीर व नियमबाह्य असतांना त्यांना मुख्याध्यापक केले . याबाबत शिक्षण विभागाने योग्यरित्या चौकशी केली तर शासनाची होणारी आर्थिक लुबाडणूक थाबेल.शिक्षण विभागाने मागील काळात संबंधित कर्मचाऱ्यास तात्पुरत्या स्वरूपात दिलेली मान्यता रद्द करण्यात आली होती. व तसेच  वेतन काढण्यास देखील मनाई आदेश केला होता.असे केल्याने अर्थातच सेवा सुध्दा खंडित झाली होती .त्यानंतर सदर कर्मचारी नियमित वेतनश्रेणीस मान्यता कधी देण्यात आली ? तरी देखील 2003 पासून नियमित वेतन काढण्यात येत आहे ते कोणत्या आधारावर ?  सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यास वैयक्तिक मान्यता देण्यात येते तेव्हा त्यातसबंधित, कर्मचारी यांचा नियुक्त दिनांक, त्याची जन्म तारीख, वेतनश्रेणी, जात प्रवर्ग,निवृत्ती दिनांक व इतर नियम अटी दर्शविलेल्या असतात. असे असतांना संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी संगनमताने  नियमबाह्य पद्धतीने बोगस शिक्षकाला मुख्याध्यापक केले.  

परंतू........ यांना अशा प्रकारची नियमित  वेतनश्रेणीस वैयक्तिक मान्यता नसताना संस्थेने 2003 मध्ये त्यांचे वेतन कोणत्या आधारावर काढले ? याबात संधीगता आहे. तरी ह्या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यास ही अत्यंत गंभीर बाब असून बोगस शिक्षकास शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक पदी विराजमान केले असून शिक्षण विभागाने तसेच संस्थेच्या अध्यक्षांनी शासनाची दिशाभूल करून शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे. तरी सदर दिशाभूल व होणारी आर्थिक लुबाडणूक थांबण्याकरिता.....यांचे वेतन थांबवून,विशेष पथक अथवा उच्चस्तरीय समिती नियुक्त करून त्यासमितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध