Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ४ जुलै, २०२४

महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथील बोगस मुख्याध्यापकांनी शासनाची केली आर्थिक फसवणूक खोटी कागदपत्रे तयार करून केली पदोन्नती...!



सविस्तर वृत्तांत असे की महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथील बोगस
मुख्याध्यापकास संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी संगनमताने वाचविणेसाठी नियमांचे उल्लघन करुन अस्थायी पदस्थ शिक्षक ज्याची सेवा नियमाने खंडीत झाली आहे.

त्यास वाचविणेसाठी व सेवा खंडित होवू नये म्हणून बेकायदेशीर अतिरिक्त कायम शिक्षक म्हणून नामनिर्देशन केले आहे. संस्थेच्या कायम अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या यादीत याचा कुठेही उल्लेख नाही. त्यासंदर्भात संस्थेच्या रेकॉर्ड मध्ये कुठेही नोंदी नाहीत. असे असतांना संबंधीत जिल्हा शिक्षणाधिकारी जि.प.धुळे यांचेशी संगनमताने दाखल केलेले स्वतचे प्रस्ताव प्रथमदर्शनी खोटे आहेत.

म्हणून बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक या पदावर काम करुन शासनाची फसवणूक व स्वार्थासाठी करीत आले आहेत अध्यक्ष सचिव व मुख्याध्यापक यांनी आर्थिक स्वार्थापोटी शासन दरबारी कागदपत्र व दस्तऐवजात खोटे रेकॉर्ड दाखवून जणू खोटी कागदपत्रे खरे आहेत असे भासवून त्यासाठी संस्थेच्या रेकॉर्ड मध्ये हेराफेरी करुन आर्थिक अपहार करुन अफरातफरीचा गुन्हा केला आहे.

(सविस्तर वाचा पुढील अंकात..)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध