Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ जुलै, २०२४

धुळे टोल वर मनसे दणका देताच अधिकारी आले वटनीवर, कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा घेतले कामावर....



धुळे प्रतिनिधी:- धुळे टोल नाक्यावरील पेट्रोलिंग च्या ७ कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता गेल्या ६महिन्यांपासून कामावरून काढून टाकण्यात आले होते तसेच त्याचा पगार थांबवण्यात आला होता.
       
सदर कर्मचाऱ्यांनी याबाबतीत सर्व पाठपुरावा केला तरी देखील त्यांना यश मिळाले नाही अखेर आज रोजी कर्मचाऱ्यांनी वैतागून उपोषणाला सुरुवात केली त्या ठिकाणी मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला तसेच प्रशासकीय अधिकारी यांना जाब विचारत मनसे दणका देत टोल नाका बंद पाडण्याचा इशारा देताच १तासातच सर्व ७ कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी मनविसे टीम चे आभार मानले.
        
यावेळी, जिल्हासंघटक. गौरव गिते, जिल्हाध्यक्ष. हर्षल परदेशी, शहराध्यक्ष. विठ्ठल पगारे, देवेन ढोले, ऋषिकेश कानकाटे आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध