Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ जुलै, २०२४

शिक्षणाधिकारीच्या संगनमताने बनावट ट्रस्टीने केल्यात नियमबाह्य शिक्षकांच्या नियुक्त्या शिंदखेडा जनता विद्या प्रसारक संस्था संस्थेत तोतया अध्यक्षचा मुजोरपणा..!



शिंदखेडा प्रतिनिधी:- जनता विद्या प्रसारक संस्था शिंदखेडा, ता.शिंदखेडा जि.धुळे संचलित जनता हायस्कुल, गायत्री माता विद्यामंदिर शिंदखेडा, कनिष्ट महाविद्यालय शिंदखेडा, गुरुदत्त हायस्कुल व कला कनिष्ठ महाविद्यालय वायपूर या शाळा/महाविद्यालयामध्ये बेकायदेशिर व नियमबाह्य पध्दतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत व त्यास नियमबाह्यपध्दतीने मान्यता देणारे शिक्षणाधिकारी यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात शासन निधी हाडप करण्यामध्ये सहभाग असल्याचे व त्यांनी शासन निधीची केलेली लुट व शासनाची फ़सवणुक केल्याचे पुरावे व माहिती आमच्या प्रतिनिधीकडे प्राप्त झालेली आहे.

जनता विद्या प्रसारक संस्था शिंदखेडा धर्मदाय संस्था असून या संस्थेने दि. 2/6/2012 रोजी सुधारीत स्किम योजनेअंतर्गत फ़ेरफ़ार अर्ज दाखल केलेला आहे. त्यानुसार विश्वस्त मंडळाची रचना ही किमान 7 (सात) व कमाल 11 (आकरा) असी असून मुख्य फ़ेरफ़ार अर्जात 7 (सात) विश्वस्तांची यादी अधिकृतपणे देण्यात आलेली आहे.यात…….पाटील यांचे नाव नाही.
यावर.……….पाटील यांनी या विश्वस्त मंडळाच्या विरुध्द मा.धर्मदाय आयुक्त धुळे व धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्याकडे यांनी अपिल/तक्रार अर्ज दाखल केले होते, मात्र ते दोन्ही कोर्टाने नामंजूर केले आहेत. याचाच अर्थ …….. पाटील हे जनता विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त नाही. हे पुर्णपणे स्पष्ट होते. असे असतांना………… पाटील यांनी धर्मदाय न्यायालयाचा अवमान करीत अतिशय बोगस पध्दतीने व ……… या शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद धुळे यांच्या संगनमताने अतिशय नियोजीतपणे शासनाची फ़सवणूक करत नियमबाह्य व बेकायदेशिरपणे शिक्षक नियुक्ती करुन त्यास कोणतेही पुरावे अथवा कायदेशिर विश्वस्त मंजूरी न पहाता शिक्षणाधिकारी यांनी त्यास मान्यता दिली. हाच एक महत्वाचा प्रश्न आहे.

मग या नियमबाह्य शिक्षकांस घेतलेली मंजूरी पहाता जवळपास साडेचार ते साडेपाच वर्ष मागील कालावधीची घेण्यात आली आहे. म्हणजेच या कालावधीचा पगार देखील नियमबाह्य पध्दतीने शासनाकडून लाटण्यात आलेला आहे. हे सिध्द होते. आता एक नविन प्रश्न  निर्माण होतो. तो शासनाचा आयकर रिर्टन या शिक्षकांनी कसा दाखल केला ? व इतकी मोठी रक्कम कश्या फ़िरवण्यात आल्यात, याबाबत आयकर विभागाकडे देखील याची चौकशीची मागणी करण्यात येऊ शकते. त्यानुसार सदर रक्कम कुठे गेली हे सिध्द करणे संबंधीतांचे काम असेल. व याच कालावधीत…… पाटील यांच्या मालमत्तेतील वाढीची देखील चौकशीची मागणी करण्यात येऊ शकते.

(सविस्तर वाचा पुढील अंकात…..)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध