Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० जुलै, २०२४

अमळगांव येथील सामाजिक न्याय अंतर्गत सुरु असलेला गांव दरवाजा कोसळला .



सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामाच्या गुणवत्तेवर दुर्लक्ष

 शामकांत पाटील (उपसंपादक)

अमळनेर   अमळगांव येथील समाजिक न्याय अंतर्गत सुरु असलेल्या कमान बांधकामाचे काम  कोसळले. कमान बांधकाम करत असतांना निकृष्ट व दर्जाहीन साहित्य वापरल्याने ही घटना घडली असल्याचे  स्थानिक लोकांकडून सांगितले जात आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी याप्रसंगी झालेली नाही.

गावाजवळ कमानीचे काम चालू असतांना ठेकेदाराकडून शासकीय नियमांची पायमल्ली झाली . कामाच्या ठिकाणी माती मिश्रीत रेतीचा सरास वापर चालु होता  .रेती,सिमेंट व वाळू याचे प्रमाण योग्य प्रमाणात वापरले जात नसल्याने  गावठी पद्धतीने रंदा मारून काम चलावूपणा ठेकदाराकडून केला जात होता .अमळगांव येथे  निकृष्ठ दर्जाचे व गुणवत्ताहिन काम होत असतांना देखिल सार्वजनिक बांधकाम उपविभाग अमळनेर येथील अधिकारी गप्प का ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे

कमानीचे काम चालू असतांना अधिकारी ,कर्मचारी यांनी भेट देवून काम नियमानुसार सुरु आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे होते. कामावर ज्या अधिकारी.कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांना बांधकाम या विषयांत कुठलेही ज्ञान नसल्याचे दिसून येते राजकीय पुढाऱ्यांच्या कृपा आशिर्वादाने ठेकेदाराचा व अधिकाऱ्याचा हा मनमानी कारभार तर चालत नाही ? असे अनेक प्रश्न सर्व साधारण जनतेच्या मनात आहेत . टक्केवारीच्या हिशोबात कामांची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळली जात आहे.ठेकेदार मनमानी कारभार करत जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे हे चित्र आहे .याला जबाबदार असनाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांचेविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग जळगांव कारवाई करेल का ?

मातीमिश्रीत निकृष्ठ वाळू (भिंगी रेती) चा सरास वापर करून बांधकाम ठेकेदार करीत असल्याने  या नविन कमानीचे  आयुष्य तरी किती दिवस असणार ? हा तर विळा मोडुन खिळा बनविण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे . जनतेच्या पैश्यांवर अधिकारी /कर्मचारी , ठेकेदार व राजकीय लोकांची पोटली  तर भरली जात नाही  ? याकडे जनतेने जागृत होवून लक्ष देणे आवश्यक आहे. कमानीचा  कणा स्लँब असतांना त्यात असा अक्षम्य दुर्लक्षपणा कसा ?  अमळगांव येथील कमान बांधकामाच्या कामात  निकृष्ठ बांधकाम साहित्य वापरून  बांधकाम झाल्यास भविष्यात ही कमान  कोसळुन मोठा अपघात  होणार नाही याची हमी अधिकारी घेतील का  ?  भविष्यात होणाऱ्या या दुर्घटनेस जबाबदार कोण ? अमळनेर तालुक्यात सुरु असलेल्या व पूर्ण झालेल्या कमानीची व गांव दरवाजे यांची गुणवत्ता तपासणे यानिमिताने आवश्यक झाले आहे.

दहिवद येथील गाव दरवाजा कमान देखील गोलाकार-

दहिवद येथील कमानीचे बांधकाम करतांना देखील ठेकेदार यांनी हलगर्जीपणा व गैरकारभार केला आहे. बांधकाम करतांना कमानीचा भाग खाली झुकला आहे .बांधकाम करताना पाणी मारण्यात आलेले नाही .गुणवत्ताहीन साहित्य वापरून काम करण्यात आले आहे. खडी पेक्षा रेतीचाच वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे.अमळगांव सारखी दुर्घटना दहिवद येथे झाल्यास त्याला जबाबदार कोण ? दहिवद गांव दरवाजा बांधकाम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते का ? असा सवाल निर्माण झाला आहे. दहिवद येथील निकृष्ठ गांव दरवाजा बांधकामाची देखील चौकशी करण्याचे आदेश जिल्हास्तरावरून झाले असल्याचे समजले आहे. दहिवद गांव दरवाजाच्या कमानीच्या स्लँबचे काम नव्याने करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे समजले आहे.


कमानी व गांव दरवाजे या बांधकामात झालेला हा भ्रष्टाचार डोळ्याला जरी दिसत नसला तरी भविष्यात अमळगांव सारखी  दुर्घटना झाल्यास सदोष मनुष्य वदाच्या गुन्ह्यास ठेकेदार व अधिकारी पात्र असतील हे मात्र निश्चित .







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध