अमळनेर i उपसंपादक – शामकांत पाटील
जळगांव शहरात आज शरद पवार गटामार्फत निष्ठावंतांचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खास माजी आमदार साहेबराव पाटील मेळाव्याला उपस्थित राहिल्याने अमळनेरच्या राजकारणात तिरंगी लढतीचे चित्र उभे राहिले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील हे अजित दादा यांचे खास असल्याने अमळनेर तालुक्यात मंत्री अनिल पाटील व शिरीष पाटील यांच्यात चुरशीची लढत होईल अशी परिस्थिती होती.
जळगांव येथील कृष्णा लॉंन्स मध्ये जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शरद पवार यांचा निष्ठावंतांच्या मेळाव्या प्रसंगी साहेबराव पाटील यांनी अनपेक्षित हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.शरद पवार यांनी अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत अशी काळजी आम्ही घेवू असे सूचक विधान केले होते.
निष्ठावंतांचा मेळावा याठिकाणी साहेबराव पाटील यांनी हजेरी लावून शरद पवार यांच्या विधानाला दुजारा दिलेला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनिल पाटील हे विध्यमान मंत्री असले तरी मंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांच्यात अमुलाग्र बदल झालेला असल्याचे कार्यकर्ते व अमळनेरची जनता बोलत आहे. मंत्री अनिल पाटील यांच्यावर नाराज असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनिल पाटील मंत्री झाल्यावर माजी आमदार शिरीष पाटील यांनी देखील जनसंपर्क कमी केल्याने ते पुन्हा येणार नाहीत अशी चर्चा तालुक्यात होती .साहेबराव पाटील नगरपालिकेचे कामकाज संपल्यावर स्वगृही राजवड येथे गेल्याने अनिल पाटील यांच्या शिवाय पर्याय शिल्लक नाही असेच चित्र तालुक्यात होते .तालुक्यात प्रकाश पाटील हे देखील आमदारकीसाठी इच्छुक असतांना कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तुतारीचा आवाज दुरपर्यत पोहचवला आहे.अबकी बार साहेबराव पाटील अशीच चर्चा तालुक्यात आहे. अमळनेरला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यात व पाडळसरे धरणात ७ टीएमसी पाणी साठवण्यात साहेबराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे .
जळगांव येथील मेळाव्यात जयंत पाटील यांनी देखील साहेबराव पाटील हे पूर्ण ताकदीने अमळनेरची विधानसभा लढतील असे सांगितल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत.
मेळाव्यात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रशांत निकम, अनंत निकम व वसुंधरा लांडगे यांनी पक्ष
प्रवेश केला. सभेला गुलाबर देवकर,सतीश पाटील ,रविंद्र भैय्या ,राजू देशमुख अमळनेर येथील
तिलोत्तमा पाटील, सचिन पाटील,श्याम पाटील आधी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा