Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४
अरणगाव शाळेत गुणवंतांचा सन्मान...
परंडा (राहुल शिंदे) दि.१५ तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा आरणगाव येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत मनोगत व्यक्त केली. तसेच विविध स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला. त्यामध्ये अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये शाळेतील कु.स्वराली अनिल पिंगळे- इयत्ता दुसरी, सौरभ शिवाजी तौर इयत्ता तिसरी, वैष्णवी धनंजय आदलिंगे इयत्ता सहावी यांनी राज्यस्तरावर गुणवंत होण्याचा मान मिळवल्यामुळे त्यांचा सत्कार आई वडील यांच्यासह करण्यात आला. तसेच पाककृती स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर विजेता ठरलेले मोहन बाब्रूवान (पिंटू मामा) कापुरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पिंगळे, उपाध्यक्ष राहुल पाटील, शिवाजी माळी, रामहरी पिंगळे उपसरपंच, तुकाराम सांगडे , प्रमोद तौर, शिवाजी तौर धनंजय आदलिंगे, अश्वेध पाटील, सुधीर पाटील, प्रमोद खैरे, ज्ञानेश्वर मिस्कीन, अशोक कुलकर्णी, वसंत कांबळे, रफिक पठाण, बाबाजन पठाण, बाबा पठाण, पांडुरंग तौर, समीर शेख तसेच पाणी फाउंडेशन च्या अर्चना मुळे , सुलन ताई सोनवणे, सुनिता कांबळे, धनश्री पाटील,पार्वती पिंगळे , वर्षा आदलिंगे , रेश्मा तौर, राजश्री पाटील , मिना माळी,मंजुषा आदलिंगे तसेच शाळेतील शिक्षका लैला मुलाणी,सुवर्णा खटाळ ,माधुरी शिंदे , माधुरी पवार मॅडम.तसेच बजरंग विद्यालय आरणगाव यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापक तसेच शालेय पोषण आहार चे मोहन कापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ देशमुख यांनी उपस्थित मान्यवराचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा