Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४
सनराईज प्रशालेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा...
परांडा दि.१५ (राहुल शिंदे ) तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज स्कूल मध्ये ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष जोतीराम जगताप, मुख्याध्यापक संभाजी देवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास दैन.रोहिदास मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात आले.
विद्यार्थिनींनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापक देवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले. देशभक्तीपर गीते सादर केली. विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रकाश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी आमटे यांनी अनुमोदन दिले आणि राहुल शिंदे, ज्योती लोमटे, नीता करळे, किर्ती शिंदे, प्रतिक्षा खरसडे यांनी मनोगते व्यक्त केली तर सुरेखा शेळके यांनी आभार मानले. पालक वर्ग व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. या वेळी सूर्यकांत औताडे, संतोष भिल्लारे, ईश्वर देवकर,महादेव भोगील, अशोक कसबे या शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
तर नवनाथ जगताप,गणेश वाघमारे, बापू दैन, बंडू बदर,सचिन खेडकर,प्रवीण पाटील,अशोक आवटे, गोकुळ शेवाळे,चंद्रकांत जेकटे,अंगद हगारे, संदिपान जरांडे आधी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा