Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत शेळगावच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी...
परंडा (राहुल शिंदे )दि.२२: तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत शेळगावच्या खेळाडूंनी आपली कौशल्याची चुणूक दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत १९ वर्ष मुले खो -खो स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक तर १७ वर्ष मुले खो - खो स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. माणिकबाबा विद्यालय शेळगांव ता. परंडाच्या १५ खेळाडूंनी १९ वर्ष खो- खो स्पर्धेत बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. सदर क्रीडा स्पर्धा खंडेश्वरी इंग्लिश मेडीयम स्कूल परंडा येथे पार पडली.
त्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव उंचावले आहे. विजयी खेळाडूंचे त्यांच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा धाराशिव जिल्ह्याचे जेष्ठ नेते अँड. सुभाषराव मोरे, संस्था सचिव अमर मोरे, माजी प्राचार्य संभाजी मोरे, सुधाकर खरसडे, गुरूदास काळे, परदेशी सर आणि पालक व ग्रामस्थांनी या यशाबद्दल सर्व खेळाडू व प्राचार्य पांडुरंग कुमठकर, क्रीडा मार्गदर्शक शिंगाडे सर तसेच सर्व शिक्षक -शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यालयाचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा