Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४
पांझरा नदी पात्रात वाळू माफियांचा सुळसुळाट महसूल यंत्रणा मात्र सुस्त
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील बाम्हने,कळंबु या पांझरा नदीपात्रालगत असलेल्या गावाजवळील नदीतून मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळू उपसा केला जात असून महसूल यंत्रणेचा मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात तापी,पांझरा आणि बोरी नदीतून वाळू माफियांकडून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.पांझरा नदीकाठी असलेल्या बाम्हने, कळंबू या गावाजवळील नदीपात्रातून शहापूर, बेटावद, व अजंदे येथील वाळूतस्करांकडून दिवसा ढवळ्या वाळू उपसा केला जात आहे. गावातील लोकप्रतिनिधी अथवा ग्रामस्थांकडून विरोध झाल्यास त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.महसूल आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पांझरा काठावरील गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
रेल्वे पुलाला उद्भवतोय धोका-
पांझरा नदीवर असलेल्या सुरत- भुसावळ रेल्वे लाईन जवळील दोन्ही पुलाखालून देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून यामुळे मात्र रेल्वे मार्गाला देखील भविष्यात धोका उद्भवू शकतो. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी याआधी रेल्वे लाईन पुलाजवळ चारी खोदून वाळू चोरी रोखण्याचे प्रमाण थांबवले होते. मात्र वाळू चोरट्यांनी ती चारी बुजून पुन्हा एकदा वाहतूक सुरू केली आहे. म्हणून रेल्वे प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी कायमस्वरूपी लोखंडी पोल गाडून येथील वाळू तस्करीचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी पंचक्रोशीत ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात येत आहेत कारण वाळू तस्कर गावातून, गल्लीतून ट्रॅक्टर, ढंपर मोठ्या वेगाने चालवत असतात त्या मुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो म्हणून प्रशासनाने यावर कायस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा