Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
साक्री विधानसभा उमेदवार देण्यासाठी मा.बच्चू कडू यांचा आदेशाने साक्री तालुका प्रहार संघटनेची दिमाखदार बैठक सम्पन
साक्री विधानसभा उमेदवार देण्यासाठी मा.बच्चू कडू यांचा आदेशाने साक्री तालुका प्रहार संघटनेची दिमाखदार बैठक सम्पन
आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशान्वये साक्री विधानसभा मतदार संघातील चाचपणी करण्यासाठी आज रोजी शासकीय विश्रामगृह साक्री येथे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांबरोबर महिला ही मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सरपंच परिषद साक्री संघटनेचे तालुकाध्यक्ष अजय भाऊ सोनवणे यांची निवड झाल्याने सत्कार करण्यात आला तसेच संभाव्य उमेदवार संजय बहिरम यांनी कार्यक्रमाला भेट दिली
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र भाऊ पगारे यांनी केले यावेळी साक्री तालुक्यातील प्रहार संघटनेच्या शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला तसेच जास्तीत जास्त शाखा उद्घाटन करण्याचे आव्हान जयेश बावा यांनी केले. महाराष्ट्र राज्याची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे कोसळला त्याचा प्रहार संघटना व पक्षाकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आले तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला
यावेळी डॉक्टर तुळशीराम गावित यांनी फोनवर संपर्क करून साक्री तालुक्यातील दिव्यांगांचे प्रश्न आमदार मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांचे प्रश्न एका छताखाली तहसील कार्यालय येथे तहसीलदार,गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, कृषी अधिकारी तसेच लीड बँकेचे मॅनेजर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी एका छताखाली बोलावून 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे शिष्ट मंडळाच्या उपस्थित बैठक पार पडणार आहे असे डॉक्टर तुळशीराम गावित यांनी संपर्क करून सांगितले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा टाळींच्या गडगडाटाने दिसून आली
यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी उत्साह दिसून अधिक जागरूक झाले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका विभाग प्रमुख जयेश बावा प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष नाना शेलार, तालुका संपर्क प्रमुख सोमनाथ राजपूत,शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष योगेश जाधव,काटवान परीसर अध्यक्ष नरेंद्र पगारे,विदयार्थी संघटना तालुका अध्यक्ष मुकेश काकुस्ते,साक्री शहराध्यक्ष राहुल नांद्रे, तालुका संघटक महेश नांद्रे,साक्री तालुका दिव्यांग संघटक शशिकांत अहिरराव, युवराज मराठे,अर्जुन राठोड,आधार देसले,तुषार सोनवणे,जगन्नाथ देवरे, रवी मैंदाणे,रमेश मैंदाणे, योगेश काळे,लक्ष्मण चिकसे,उत्तम मैंदाणे आदी उपस्थित होते.
तरुण गर्जना वृतपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा