Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणेत टायरची जाळपोळ,रास्तारोकोमुळे तणाव,तरुणाच्या खुनामुळे आदिवासी समाज आक्रमक पवित्रात
साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणेत टायरची जाळपोळ,रास्तारोकोमुळे तणाव,तरुणाच्या खुनामुळे आदिवासी समाज आक्रमक पवित्रात
पिंपळनेर,दि.21साक्री तालुक्यातील जैताणे येथे प्रेयसीसोबत गप्पा मारणार्या आदिवासी भिल समाजाच्या तरूणास बेदम मारहाण करण्यात आली.उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला.याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल असून पोलिसांनी तीन जणांना अटकही केलेली आहे. दरम्यान या घटनेचा निषेधार्थ आज आदिवासी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला.रस्त्यावर टायरची जाळपोळ करीत रास्तोरोको आंदोलन केले.अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला.व्यावसयीकांनी आपली दुकाने,व्यवहार बंद केले.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे,निजामपूर पोलिस ठाण्याचे सपोनि मयुर भामरे,पोसई प्रदिप सोनवणे यांच्यासह कर्मचार्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.अजय राजेंद्र भवरे.वय20रा.भिलाटी , वासखेडी रोड,जैताणे असे मयत तरूणाचे नाव आहे.
तो दि.18 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्याची प्रेयसी सोबत परिसरात गप्पा मारीत होता.त्यादरम्यान गावातील विरोबा देवाचे मंदिराच्या बाजूला असलेल्या घरामध्ये राहणारे तुकाराम बाळू शिंदे,वैभय तुकाराम शिंदे,
रावसाहेब बाळु शिंदे,रविंद्र चैत्राम धनगर या चौघांनी अजय भवरे यास त्याचे नाव गाव विचारुन तो आदिवासी भिल्ल समाजाचा आहे,म्हणून त्यास जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली.हाताबुक्यांनी व लाकडी काठीने हातापायांवर व डोक्यावर जबर मारहाण करुन त्यास गंभीर जखमी केले.उपचार सुरु असतांना अजय याचा काल दि.20 रोजी सायंकाळी मृत्यू झाला.याबाबत राजेंद्र दगडु भवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांवर काल रात्रीच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तत्काळ तुकाराम शिंदे,रावसाहेब शिंदे व रविंद्र धनगर या तिघांना ताब्यात घेतले.दरम्यान या घटनेच्या निषेधार्त आज सकाळी तरूणाच्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत टायर जाळून रास्तोरोको आंदोलन सुरू केले.
त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.परिस्थिती पाहुन व्यावसायीकांनी देखील आपले व्यवहार बंद केले. रास्तारोकोनंतर आंदोलनकांनी निजामापूर पोलिस ठाणे गाठत आरोपींना आमच्या समोर उभे करा, अशी मागणी लावून धरली.
यावेळी पोलिस अधिकार्यांनी आंदोलकांना तरूणाच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.त्यामुळे कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेवून नये,शांतता ठेवावी,असे आवाहन केले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा