Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्यातील कृषि विभागाची धडक कारवाई गुजरात येथील बनावट सेंद्रिय खताचा मोठा साठा जिल्हा कृषी विभागाकडून जप्त करण्यात आला
जळगाव जिल्यातील कृषि विभागाची धडक कारवाई गुजरात येथील बनावट सेंद्रिय खताचा मोठा साठा जिल्हा कृषी विभागाकडून जप्त करण्यात आला
गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांद्रा,ता. जळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर शुक्रवार दि. २० रोजी १५२ गोण्या उतरवत असताना छापा टाकून जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,राज्य शासनाचे गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी आवाहन केल्यानुसार गुजरात राज्यातील अवैध,विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने तपासणी सुरु केली आहे.त्यानुसार शुक्रवारी जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा,ता.जळगाव येथे गुजरात राज्यातील खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी धीरज बढे,मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले यांच्या पथकाने पाळत ठेवून ट्रक मधून मे.जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या.या सेंद्रिय खतांच्या बॅगवर मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन या खत कंपनीचे बोगस नाव टाकून शेतकऱ्यांना विक्री केले जात आहे.मे. दक्षकमल ट्रेडर्स,शहादा जि.नंदुरबारचे मालक संशयित चंद्रकांत पाटील हे में.जेनिक केमटेक कार्पोरेशन या कंपनीचे नाव टाकून सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्री केली जात असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
तरुण गर्जना न्युज चॅनल धुळे जिल्हा प्रतिनिधी
चंद्रशेखर अहिरराव
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा