Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४
जनतेला मारणं हेच
आजच्या राजकारण्यांचं धोरण
लोकांचं होतं मरण
यांच्या घराला तोरण.
एकजात बनलीय सारी
तिजोरी नेता घरी
जींकण्या साठी वापरताय
उपाय सारा अघोरीं.
जाहिरातीनचा करता गाजावाजा
जनतेच्या पैश्यातून मजा
लोकांना मिळते सजा
भटकतो देशाचा राजा.
फोडा, तोडा झोडा
नीती सारी गोऱ्यांची
त्याहून दृष्ट बुद्धी
लोकं म्हणतात काळ्यांची.
देखावा विकासाचा भारी
लुटालूट सुरू सारी
लालूच दाखवत जनतेला
पैसा सारा राजदरबारी.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव पिन. 425108
मोबाईल 9922239055
राजकारण
नको वाटतं राजकारण
असतंय सारं सत्ताकारण
सर्वोच्च खुर्ची साठी
निर्माण करता वातावरण.
उधळत सारा पैसा
वापरत जाहिरात भडीमार
विचार करतं सारासार
उचलता निवडणुकीचा भार.
मिळाली एकदा खुर्ची
मग शोधता आर्ची
हिशोब करता सारी
वाटलेल्या साऱ्या पर्ची.
लुटून जनतेला सारं
मग काढता खर्ची
सारं काही जनतेचं
भोगता मग खुर्ची.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा जळगाव पिन 425108
मोबाईल. 9922239055
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा