Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. २४- अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे.विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा,अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली आज पुणे महानगर विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली.बैठकीत पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक,वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा,मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,की मुख्य पुणे शहर दाटीवाटीचे झाले आहे,ही परिस्थिती बदलण्यासाठी नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा राहतील,याची काळजी घ्या. पुण्याच्या विकासाचे नियोजन करतांना तज्ज्ञांची मदत घ्या,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.पुण्यात होणाऱ्या कव्हेशन सेंटर हे जागतिक दर्जाचे होण्यासाठी नियोजन करावे, गुंठेवारी अधिनियमातील नियमितीकरणाचे शुल्क कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा,हे शुल्क भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत विशेष सवलत उपलब्ध करुन जास्तीत जास्त जमिनी नियमित करुन घ्याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले,की पुणे महानगराचा प्रारुप विकास आराखडा तयार करतांना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल,अशा प्रकारे तयार करावा. तसेच पीएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाची गुणवत्ता चांगली राहिल, याची काळजी घ्यावी.घरांच्या गुणवत्तेत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.तयार असणाऱ्या एकूण ४ हजार ८८६ घरांपैकी उरलेल्या १ हजार ६२० घरांची सोडत लवकरच काढण्यात यावी.तसेच दुसऱ्या टप्प्यातील ६ हजार घरांच्या बांधकामास वेग देण्यात यावा.सोबतच या घरांचे बांधकाम करतांना उद्यान,मोकळी जागा सारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत ५ कोटी ७५ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी पुणे महानगर प्रदेशासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या स्थापनेस आणि १० ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र निर्मितीस मान्यता देण्यात आली.११ ठिकाणी मलनिस्सारण योजना तयार करण्यास,लोणावळा येथे टायगर व लायन्स पाँईंट येथे ग्लास स्कायवॉक तयार करण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधु...
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
पालकमंत्री गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण अमळनेर : तालुक्यातील क्रीडा संकुलातील जुन्या व न...
-
🛑 _अमळनेर : झोपडीला अचानक आग लागल्याने बोदर्डे येथील काशिनाथ दिलभर भिल या वृद्धाचे कुटुंब उघड्यावर आले असून संसार उध्वस्त झाल्याची घटना २...
-
साक्री तालुक्यातील बल्हाणे गावाचे भूमी पुत्र व सद्या पिंपळनेर येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...
-
साक्री (प्रतिनिधी) – खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
नंदुरबार प्रतिनिधी : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा व शिंदे शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आहे. 'लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस...
-
साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) – साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने खरीप हंगामपूर्व ...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा