Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
दूध का दूध पाणी का पाणी करीत धुळे मनमाड रेल्वे मार्गाचे श्रेय घेणाऱ्यांना सणसणीत चपराक महाराष्ट्र,मध्य प्रदेशच्या मीडियासमोर दिल्लीत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमार्गाचे क्रेडीट दिले माजी मंत्री डॉ.सुभाष भामरेना
दूध का दूध पाणी का पाणी करीत धुळे मनमाड रेल्वे मार्गाचे श्रेय घेणाऱ्यांना सणसणीत चपराक महाराष्ट्र,मध्य प्रदेशच्या मीडियासमोर दिल्लीत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमार्गाचे क्रेडीट दिले माजी मंत्री डॉ.सुभाष भामरेना
बहुप्रतिक्षीत,बहुधचीत आणि धुळेकरांची भाग्यरेषा बदलण्याची ताकद ठेवणान्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे घोडे अखेर गंगेत न्हाले.मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी केंबिनेटने आर्थिक मंजुरी दिली. मनमाड-इंदूरला ग्रिन सिग्नल मिळाल्यानंतर धुळ्यात श्रेयवादाचा पुर बाहेर पडू लागला.त्यातुन कौन सच्चा,कौन झुठा अशी स्थिती निर्माण झाली, जो तो आपआपल्या परिने रेल्वेमार्गाबाबत आपणच कसा
पाठपुरावा केला आणि आपल्यामुळेच कशी रेल्वे धावणार आहे हे सांगु लागले.परंतु सचाई समोर आलीच.गेल्या दहा वर्षांपासून रेल्वेमार्गासाठी अथक आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रयत्न करणारे धुळेचे तत्कालीन खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या पाठीवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या मिडियासमोर खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच कौतुकाची थाप हाणली.व सत्य स्वच्छपणे दिसू लागले.मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे श्रेय माजी संरक्षण राज्य मंत्री
खा.डॉ.सुभाष भामरे यांचेच
असल्याचे पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखीत केले आहे . याबाबतची
माहिती खास दिल्लीवरुन
मीडियाशी संपर्क साधत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
डॉ. सुभाष भामरेंनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,रेल्वे
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट बैठकीत १८ हजार ३६
कोटी रुपयांचा निधी धुळे,मनमाड
इंदोर या रेल्वेमार्गाकरीता जाहीर
लढाईमुळे संभ्रम निर्माण झाला.धुळेकरांचा तो संभ्रम खुद रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच दुर केला.दि.३ सप्टेंबर रोजी रेल्वेमार्गाबाबतची वस्तुस्थिती मांडण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या पत्रकारांना सोबत बैठक घेवून नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेसाठी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे माजी खासदार डॉ.सुभाष भामरे यांना खुद्द
रेल्वेमंत्र्यांनी आमंत्रीत केले.
व रेल्वेमार्गाला आर्थिक मंजुरी मिळाल्याबद्दल धुळ्यात या
रेल्वेमार्गाचे श्रेय घेण्यासाठी
चढाओढ सुरु झाली.
सर्वांचा उपस्थितीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेत रेल्वेमार्गाबाबत माहिती देत असताना दहा वर्षात खासदार असताना डॉ.सुभाष भामरे यांनी सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला.त्यांच्या पाठपुराव्यामुळेच रेल्वेमार्ग फळाला आला,असे सांगत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माजी खा.डॉ.सुभाष भामरेंचे तोंड भरून कौतुक केले.व अखेर उधाण आलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा