Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
साक्री शहरात स्वराज ट्रॅक्टर शोरूम सिया इंटरप्राईजेसचे गणेश चतुर्थीच्या शुभ मोहर्तावर एकवीस ट्रॅक्टर विक्री करत जल्लोषात सुरुवात.
साक्री शहरात स्वराज ट्रॅक्टर शोरूम सिया इंटरप्राईजेसचे गणेश चतुर्थीच्या शुभ मोहर्तावर एकवीस ट्रॅक्टर विक्री करत जल्लोषात सुरुवात.
आज साक्री शहरात साक्री धुळे रस्त्यावर हॉटेल उदय पॅलेस शेजारी भारतीय शेती क्षेत्रातील अग्रगण्य असे ट्रॅक्टर बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी स्वराज प्रा.लि.ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते तुलसी ट्रॅक्टर धुळे व साक्री शहराचे अधिकृत डीलर मे.सिया एंटरप्राइजेस साक्री यांच्या नवीन वास्तूचे म्हणजेच शोरूम चे उद्घाटन आज पार पडले.यावेळी शोरूम चे मालक श्री सागर सूर्यवंशी (पाटील) यांनी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्ताचे अवचित्त्य साधून सुमारे 21 स्वराज ट्रॅक्टर एकाच वेळी विक्री करण्याचा विक्रम केला आहे.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायणाची पूजा करून व गणरायाची स्थापना करून करण्यात आली व या कार्यक्रमात सर्व ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांच्या पत्नींना बोलावून त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करून ढोल तश्याचा गजरात त्यांना नवीन ट्रॅक्टर सोपावले गेलेत.या कार्यक्रमाला विशेष उपस्थित स्वराज ट्रॅक्टर कंपनीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सेल्स मॅनेजर कंपनीचे एम्प्लॉईज मेकॅनिकल आदी सर्व उपस्थित होते.स्वराज ट्रॅक्टर शोरूम चे मालक त्यांची पत्नी,आई वडील,मित्रपरिवार,नातलग शोरूम चा सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होता तसेच कार्यक्रमात भोजनाचे देखील व्यवस्था करण्यात आली होती.
तरुण गर्जना न्युज चॅनल धुळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा