Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

अमळनेरात २८ वर्षीय महिलेचा खून पोलिसांची वेगाने फिरवली तपासचक्रे



अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील एका २८ वर्षीय महिलेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शीतल जय घोगले वय 28 रा गांधलीपुरा ही महिला मृत अवस्थेत बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली. तिला डोक्याला मार लागलेला होता तसेच तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून आला. 

घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर ,पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , गणेश पाटील , सागर साळुंखे ,निलेश मोरे ,जितेंद्र निकुंभे ,अमोल पाटील , सिद्धांत शिसोदे , स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे ,रवी पाटील, दीपक माळी ,प्रवीण मांडोळे ,संदीप पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान महिलेचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध