Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ सप्टेंबर, २०२४
पत्रकार कृष्णा पाटील यांना राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर
रावेर / तालुका प्रतिनिधी
साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट (ANAJ) तर्फे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल 2024 या वर्षाचा राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
21 सप्टेंबरला गांधीनगर (अहमदाबाद ) गुजरात येथील हेलिपॅड एक्झिबिषण सेंटर मध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते व गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातून कृषी पत्रकारितेतून पुरस्कार जाहीर झालेले कृष्णा पाटील हे एकमेव पत्रकार ठरले आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराची घोषणा असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट (ANAJ) संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन गिरोळकर यांनी केली. गेल्या तीस वर्षांपासून पत्रकारितेत व दहा वर्षापासून साप्ताहिक कृषिसेवकच्या माध्यमातून कृषी विस्तार व शेतकऱ्यांना मार्गदर्शन या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पेपर वाटणारा मुलगा ते यशस्वी संपादक अशी ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा