Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

धुळे जिल्हा कृषी अधिकारी पदी श्री भास्कर जाधव यांची नियुक्ती पिंपळनेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या च्या वतीने साहेबांचा सत्कार व सधीच्छा भेट



नुकताच पदभार स्वीकारलेल्या धुळे जिल्हा नवनिर्वाचित अनुभवी हुशार मेहनती प्रामाणिक असे नवनिर्वाचित जिल्हा कृषी अधिकारी म्हणून श्री भास्कर जाधव साहेब यांनी पदभार स्वीकारला व पिंपळनेर शहरात कृषि सेवा केंद्र चालकांची सामूहिक भेट घेतली यावेळी सर्व डीलर्स बांधवांची साहेबांनी ओळख व परिचय करून घेतला
व सर्व डीलर बांधवांना कृषी दुकानदारी व्यवसाय करत असताना शासनाचे काय काय नियम व अटी काळजीपूर्वक पाळाव्यात प्रमाणित केलेलेच बियाणे विकावे व कुठल्याही दुकानदाराने चुकीच्या पद्धतीचे उत्पादन विक्री करू नये तसेच रासायनिक खतांची विक्री ही पी.ओ.एस. मशीनद्वारे अधिकृतपणे विक्री करावी तसेच कुठल्याही डीलरनें शेतकऱ्यांना लिंकिंग करून खते किंवा बियाणे यांची विक्री करू नये असे निर्देशी यावेळी पिंपळनेर परिसरातील सर्व डीलर्स बांधवांना धुळे जिल्हा कृषी अधिकारी श्री.भास्कर जाधव साहेब यांनी सूचना दिल्या.
तसेच कृषी दुकानदार व शेतकरी हे एकमेकांसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी काही नियम बांधून दिले आहेत "शेतकऱ्यांचा विश्वास हाच आपला ध्यास" या उक्तीप्रमाणे सर्वांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा
आशा सक्त सूचना या मीटिंगमध्ये देण्यात आल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील 25 ते 30 कृषी दुकानदार उपस्थित होते.पिंपळनेर शहर कृषी डीलर्स असोसिएशनचे श्री नरेंद्र भदाणे उप अध्यक्ष श्री संजू शेठ यांचा नियोजनात ही मीटिंग यशस्वीरित्या पार पडली या कार्यक्रमाला चहावर नाश्त्याची देखील सोय करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध