Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची भाजप कार्यालया कडून अधिकृत घोषणा
महाराष्ट्र राज्य विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची भाजप कार्यालया कडून अधिकृत घोषणा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगाने राजकीय घडामोडी समोर येत आहेत.निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची २९ आँक्टोंबर ही शेवटची तारीख आहे.महायुतीत अनेक दिवसांपासून जागावाटपाबाबत चर्चा सुरू होत्या.
आज अखेर भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.यामध्ये विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे.यातच चिंचवड पोटनिवडणुकीत विजय मिळावलेल्या अश्विनी जगताप यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. याठिकाणी शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या घोषणांकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिले होते. यातच आता भाजपने मोठी आघाडी घेत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,गिरीश महाजन,श्वेता महाले, अशा दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे.अलिकडेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेस केलेल्या अशोक चव्हाण यांच्या मुलीला भोकरदन मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.काही ठिकाणी नव्या उमेदवारांना देखील भाजपने संधी दिली आहे.
भाजपच्या ९९ उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
देवेंद्र फडणवीस - नागपूर दक्षिण पश्चिम
चंद्रशेखर बावनकुळे - कामठी,
राजेश उदयसिंह पाडवी - शहादा
विजयकुमार गावित- नंदूरबार,
अनुप अग्रवाल- धुळे शहर,
जयकुमार रावल-सिंदखेडा,
काशीराम पावरा- शिरपुर,
अमोल जावले-रावेर,
संजय सावकारे-भुसावळ,
सुरेश भोले-जळगाव शहर,
मंगेश चव्हाण-चाळीसगाव,
गिरीश महाजन-जामनेर,
श्वेता महाले- चिखली,
आकाश फुंडकर-खामगाव,
संजय कुटे-जळगाव (जामोद),
रणधीर सावरकर- अकोला पूर्व,
प्रताप अडसद-धामगाव रेल्वे,
प्रवीण तायडे-अचलपुर,
राजेश बकाने-देवळी,
समीर कणावर-हिंगणघाट,
पंकज भोयर-वर्धा,
समीर मेघे- हिंगना
मोहन माते- नागपूर दक्षिण,
कृष्ण खोपडे-नागपूर पुर्व,
विजय रहांगडाले-तिरोरा,
विनोद अग्रवालृ-गोंदिया,
संजय पुरम-अमगाव,
कृष्णा गजबे-आर्मोरी,
सुधीर मुनगंटीवार-बल्लापूर,
बंटी भांगडिया-चिमूर.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा