Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

अज्ञात कार मधून विदेशी मद्याची तस्करी,सहा लाख १४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त पिंपळनेर पोलिसांची दमदार कारवाई



पिंपळनेर : एका कारमधून होणारी विदेशी मद्याची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले असून या कारवाईत पाच लाख रूपये किंमतीच्या कारसह १ लाख १४ हजार ५०० रूपये किंमतीचे विदेशी मद्य असे एकूण ६ लाख १४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि किरण बर्गे यांना जी.जे.०५/आर. सी. ९९३० क्रमांकाच्या कारमधून गुजरात राज्यातील दिव व दमण येथुन महाराष्ट्र हद्दीतील साक्री तालुक्यातील शेलबारीमार्गे विदेश मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.त्या अनुषंगाने स.पो.नि किरण
बर्गे यांनी पिंपळनेर पोलिसांसह एलसीबी शाखेच्या पथकास कारवाईच्या सुचना केल्या.यात पिंपळनेर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास शेलबारी जवळील हॉटेल सरकार ढाबा येथे वरील संशयित वाहनासह येतांना दिसले.कार चालकास थांबवून विचारणा केलीस असता चालकाने उडवाउडीची उत्तरे दिली.
परिणामी या पथकाने कारची तपासणी केली असता कारमध्ये सुमारे एक लाख १४ हजार ५०० रूपये किंमतीचे विदेशी मद्यसाठा हाती लागला.चौकशीत चालकाकडे वाहतुकीचा अगर कुठलाही कायदेशिर परवाना मिळुन आला नाही. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चालक मांगिलाल लाखाराम विश्नोई (४४) रा.कुराडोकी ढाणी लालजीकी डुंगरी,
ता.चितलवाणा,जि.सांचोर,राजस्थान याचे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोसई भूषण शेवाळे करीत आहेत.या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे,धुळे एलसीबीचे पो.नि.श्रीराम पवार यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि किरण बर्गे,पोसई भूषण शेवाळे,पो.कॉ नरेंद्र माळी,रविंद्र सुर्यवंशी,पंकज वाघ,प्रविण धनगर,संदीप पावरा,कपिल पावरा,सदेसिंग चव्हाण,अतुल निकम यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध