Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

धुळे जिल्ह्यात नुकतीच महाराष्ट्र राज्य कृषी मार्केटिंग कर्मचारी संघटनेची पदाधिकारीची निवड कार्यकारणी जाहीर करण्यात आली



 महाराष्ट्र राज्य कृषि मार्केटिंग कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात धुळे जिल्ह्यातून शिरपूर शिंदखेडा साखरी व धुळे ग्रामीण धुळे शहर या पाचही तालुक्यांमध्ये कृषी मार्केटिंग संघटनेच्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर निवड करण्यात आली या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत की संघटनेच्या कुठल्याही सदस्यावर कुठल्याही प्रकारची कर्मचाऱ्यावर कंपनी किंवा कंपनीचे वरिष्ठ अन्याय करत असतील तशा सदस्याला वरिष्ठ पातळीवर मदत करण्याचा हेतू ठेवून या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे जसे की काही वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी जाणीव पूर्वक थांबून ठेवतात त्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा कंपनी पुरवत नाही त्याला त्याचा मृत्यूनंतर कुठलेही आर्थिक मदत देत नाही व यासाठी कर्मचाऱ्यांनी देखील आपले काम प्रामाणिक पणे करणे गरजेचे आहे तसेच कृषी कर्मचाऱ्यांना कुठलीही विमा पॉलिसी क्लेम P F इतर सुविधा पुरवल्या जात नाहीत जर अचानक कर्मचाऱ्यांचा अपघाती जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याचा परिवाराला कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही त्यामुळे त्याच परिवार उघड्यावर पडतो पोर बाळ अनाथ होतात कर्मचाऱ्यांच्या जीवावर कंपन्या लाखो करोडो रुपये चा धंदा करतात या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यावर खर्च करायला वेळ काढू पणा करतात असे न करताअशा वेळी कुठल्याही कंपनीने त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे 
या व अशा अनेक कारणासाठी आपली संघटना प्रयत्नशील राहील या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी मार्केटिंग संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्यात धुळे जिल्ह्यातून चारही तालुक्यांसाठी प्रत्येकी दोन पदे एक तालुका संघटक व दुसरे तालुका संपर्क प्रमुख अशी निवड करण्यात आली आहे त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

 महाराष्ट्र राज्य संघटक पदी 
श्री.मंगेश देशमुख व निलेश पाटील. 

खान्देश विभागीय संघटक व संपर्क प्रमुख 
श्री.योगेश मगर व सुनील खाडवे.

धुळे जिल्हा संघटक व संपर्क प्रमुख 
श्री राहुल मैराळे व सुलभ पवार.

धुळे जिल्हा निवड समिती 

1) धुळे - 1) सुनील पाटील.    
             2) समाधान पाटील.

2) शिरपूर  - 1) अनिल काळे.
                  2) बाळू पाटील.

3) शिंदखेडा  - 1) नरेंद्र गिरासे.
                      2) शुभम शिंदे.

4)  साक्री - 1) दादाभाई ठाकरे.  
                 2)चंद्रशेखर अहिरराव (पत्रकार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध