Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४
डॉ.अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा मंगल कार्यालयात पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी उमेदवार डॉ अनिल शिंदे म्हणाले की माझ्या कामाची पद्धत सर्वांनी पाहिली असुन ,सर्व संस्थांमधून मी काम करत आलो आहे.
या निवडणुकीत “साधा माणूस आपला माणूस” हेच माझे ब्रीदवाक्य असून हात दाखवा गाडी थांबवा हीच माझ्या कामाची पद्धत आहे.मी निवडून आल्यास अमळनेरचे बारामती नाही पण शिरपूर नक्की करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच उमेदवारी मिळण्यास उशीर झाला तरी मी मैदानात आधीपासूनच होतो, माझी एक प्रचार फेरी पुर्ण झाली आहे,आम्ही सर्व एकसंघ झालो असून आज रॅलीत सर्व दिसले याचे समाधान आहे.माजी आमदार कृषिभूषण साहेबराव आज नसले तरी त्यांनी गजानन महाराज यांची शपथ घेऊन सांगितले की मी सोबत आहे असे त्यांनी आवर्जून सांगत अमळनेर येथे सभा मागितल्या असून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, शरदचंद्र पवार किंवा खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा होऊ शकतात असे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.रॅली सुरू असताना डॉ रवींद्र चौधरी यांनी शुभेच्छा व स्वागत का केले या प्रश्नावर हे त्यांनाच विचारा असा खुलासा त्यांनी केला.
उमेदवारी अर्ज भरताना माजी आमदार डॉ बी एस पाटील , तिलोत्तमा पाटील , सुलोचना वाघ, शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पाटील , धनगर दला पाटील,प्रा सुभाष पाटील, मुन्ना शर्मा, बी के सूर्यवंशी , गोकुळ बोरसे , मनोज पाटील , संदीप घोरपडे डॉ रविंद्र पाटील,बन्सीलाल भागवत यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
© डॉ. दिलीप तिवारी पाळधी - तरसोद बायपासवरील रेल्वे पुलाचा तरसोदकडील भागाचा उजवीकडील भराव कोसळून तीन महिने होत आले आहेत. तेथील दुरुस्तीच्या क...
-
माधव खाबिया:- वणी पोलीस ठाणे जिल्हा नाशिक यांचेकडील पोलीस ठाण्यात गुरन व कलम सि.सि.टी.एन.एम. गुरनं २९८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१०(२) प्रमाणे ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा