Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

दोंडाईचा येथील स्वप्निल माळीची राष्ट्रीय संघात निवड!



दोंडाईचा प्रतिनिधी : येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी स्वप्नील अनिल माळी हा सोनिपत ( हरियाणा ) येथे सुरु असलेल्या 32 व्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होता.त्याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात ऑलराउंडर खेळाडू म्हणून स्तुत्य निवड करण्यात आली आहे. त्याला प्रशिक्षक विशाल माळी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तर गेल्या दिड वर्षांपासून तो प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सराव करत होता. त्याच्या मेहनतीचे फळ प्राप्त झाल्याने शाळेत आनंद साजरा करण्यात आला. तो नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
            
त्याने आपल्या कौशल्याचा बळावर, अपार मेहनतीच्या जोरावर अभ्यासाबरोबरंच छंद जोपासून हे यश मिळविले आहे. ह्या यशासाठी त्याची आई कविता माळी तसेच वडील अनिल माळी यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य त्याला लाभले. ह्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन मा.आ. वृक्षमित्र बापूसाहेब रावल, सचिव शिप्राताई रावल यांनी त्याचे कौतुक केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा राजपूत, ज्योत्स्ना मेहता, मुमताज बोहरी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

कॅप्शन: दोंडाईचा तालुका शिंदखेडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी स्वप्निल अनिल माळी तसेच प्रशिक्षक विशाल माळी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध