Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
स्टेशन रोडच्या अतिक्रमण पीडितांच्या भेटीला खा.चंद्रशेखर आजाद (रावण) यांची ची धुळ्यात शहरात एन्ट्री....
स्टेशन रोडच्या अतिक्रमण पीडितांच्या भेटीला खा.चंद्रशेखर आजाद (रावण) यांची ची धुळ्यात शहरात एन्ट्री....
प्रतीनिधी-: धुळे शहराचा महत्वपूर्ण भाग असणारे धुळे स्टेशन रोड दसेरा मैदान या परिसरात गेल्या 60 ते 70 वर्षापासून तीनशे ते साडेतीनशे परिवार वास्तव्यास होते परंतु 2017 साली जातीयवादी मानसिकतेच्या महानगरपालिकेतील आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या संगणमताने भर दिवसा जेसीबीच्या साह्याने तीनशे ते साडेतीनशे घरी उध्वस्त करण्यात आली जणू काय हा भाग कुठला आजार असल्यासारखं एका साईडला काढून फेकण्यात आले एवढी दयनीय अवस्था या समाज बांधवांची या ठिकाणी करण्यात आली त्याकाळी स्टेशन रोड चे ज्येष्ठ नेते आनंदराव बागुल यांनी जीवाची परवा न करता सुमारे एक ते दीड महिने सर्व समाज बांधवांसह संपूर्ण तीनशे साडेतीनशे वस्तीतील परिवारातील घेऊन धुळे महानगरपालिकेच्या समोर बिढार आंदोलन करीत निगरगठ शासन प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी खोटे आश्वासन देऊन 2017 तील ते प्रचंड मोठे आंदोलन थंडावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही काळातच स्टेशन रोड चे ज्येष्ठ नेते संघर्ष योद्धा आनंदराव बागुल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले म्हणून आज तागायत या आंदोलनाकडे व या परिसराकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले परंतु त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे परिवार ज्या परिस्थितीमध्ये आयुष्य जगत आहेत त्यांची अवस्था पाहता एखाद्या दगडाला देखील पांजर फुटेल एवढी भयाव अवस्था तेथील नागरिकांची झाली आहे परंतु निगरगट्ट शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत म्हणून स्टेशन रोड परिसरातील युवा नेते आकाश देविदास बागुल, विनोद अण्णा केदार, किरण भाऊ ढिवरे, यासह इतर युवांनी एकत्रित येत या आंदोलनाला या आंदोलनाला परत एकदा चालना देण्याची सुरुवात केलेली आहे दिनांक 21 -10 -2024 रोजी धुळे शहरात बहुजन हक्क परिषद संबोधित करण्यासाठी आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार ऍड.भाई चंद्रशेखर आझाद हे धुळे शहरात आले असता प्रदेशाध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे यांनी वैयक्तिक लक्ष घालत जिव्हाळ्याचा मुद्दा असल्याचे भाई चंद्रशेखर आजाद यांना सांगितले म्हणून भाई चंद्रशेखर आजाद रावण यांनी दशेरा मैदान या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन समाज बांधवांची भेट घेणार असल्याचा आग्रह धरला त्यांच्या आग्रहाखातील सर्व समाज बांधवांना एकत्रित जमण्याचे आवाहन यावेळी आनंदी लोंढे यांनी केले,
यावेळी 300 साडेतीनशे उध्वस्त आणि पीडित परिवाराला भेट देण्यासाठी भाई चंद्रशेखर आझाद रावण यांनी प्रत्यक्षात घरात जाऊन घराची पाहणी केली व तेथील लोकांची संवाद साधला भाई चंद्रशेखर आजाद यांनी भावनिक होत तेथील नागरिकांना महिला भगिनींना सांगितले की डरो मत ये तुम्हारा भाई तुम्हारे साथ मे है मै तुम्हारा मुद्दा संसद में उठाऊंगा, त्या क्षणात काही महिला भगिनींचे अश्रू अनावर झाल्याने त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितले की आम्ही खूप वाईट अवस्थेत या ठिकाणी जगत आहोत आम्हाला कोणाचाही सारा नाही त्यावेळेस भाई चंद्रशेखर आझाद यांनी युवा नेते आकाश बागुल, विनोद आण्णा केदार, किरण ढिवरे, यांच्या खांद्यावर ठेवत समाज बांधवांना सांगितले की ये मेरे तीन शेर तुम्हारे साथ खडे हे ओर मै उनके साथ मे खडा डरने की जरूरत नही है. यावेळी स्टेशन रोड परिसर घोषणांनी दानानून उठला होता, त्यानंतर भाई चंद्रशेखर आझाद हिंद संतोषी माता चौकातील सभेसाठी रवाना झाले त्यावेळी देखील त्यांनी भर सभेत स्टेशन परिसरातील 300 ते 350 घरांचा उल्लेख करीत सांगितले की मै उन लोगो को न्याय दिला करही रहूंगा, आनंद जी अगर टाईम पडा तो मै खुद धुलिया नगर निगम मे आकर आपके नेतृत्व मे धरणा दुंगा, यावेळी प्रचंड घोषणांच्या व टाळ्यांचा गरगडात करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा