Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

नाशिक जिल्ह्यातील सायखेडा तालुका निफाड येथे बनावट कांदा बियाणे प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल.



आज दि.२१.१०.२०२४ रोजी मे.राही नॅचरल सिडस प्रा.लि. पिंपोडे बु तालुका कोरेगाव या बियाणे उत्पादक कंपनीचे नाव वापरून तीर्थ एजन्सी इंदोर यांनी फुरसुंगी प्लस ह्या नावाने बनावट बियाणे वाण तयार करून ते नाशिक जिल्हात व परीसरात विक्री होत असल्याची माहिती नाशिक जिल्हा गुण नियंत्रण भरारी पथकास मिळाली होती.
मे.राही नॅचरल सिडस प्रा.लि.च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत भरारी पथकाने सायखेडा तालुका निफाड येथील ग्रो ऍग्रो सॉल्युशन या कृषी सेवा केंद्रामध्ये छापा टाकून रक्कम रुपये ३१२००/-ची बनावट कांदा बियाणे पाकिटे भरारी पथकाने पकडले.
सुभाष काटकर,विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक,
कैलास शिरसाठ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,नाशिक,संजय शेवाळे,कृषी विकास अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली
मध्यप्रदेशातून नाशिक आणि लगतच्या तालुक्यांमध्ये कांदा बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी कारवाई कृषी विभागाने केली आहे.
मे.रोहित घुगे,अग्रो सोलूग्ल्युशन सायखेडा व तीर्थ अग्रो एजन्सिज,इंदोर यांच्या विरोधात बियाणे कायदा १९६६,बियाणे नियम १९६८ लावून गुन्हा दाखल करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध