Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

आमदार मंगेश चव्हाण सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर महाविकास आघाडी कडून अद्याप चित्र स्पष्ट नसल्याने या जागेवर तिढा कायम



महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नुकतीच ९९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.त्यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली असून आमदार चव्हाण हे दुस-यांदा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.अर्ज भरण्याची प्रक्रिया आज २२ ऑक्टोबर पासून सुरू होत असून आमदार मंगेश चव्हाण हे सोमवार दिनांक २८ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी  पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 
दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवारीचा तिढा अजून कायम असून या जागेवर महाविकास आघाडीमध्यें चाळीसगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून जबरदस्त रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही.राष्ट्रवादी शरद पवार गट ही जागा आपल्याकडे कायम राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असून दुसरीकडे माजी खासदार उन्मेष पाटील हे देखील मुंबईत तळ ठोकून आहे.त्यामुळे आता उबाठा बाजी मारतो की शरद पवार गट ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होते याकडे सर्वांत लक्ष लागुन आहे. भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ? याची उत्सुकता चाळीसगाव तालुक्याला लागली आहे.उद्या किंवा परवा पर्यंत महाविकास आघाडीचा तिढा सुटून उमेदवारीचा फैसला होणार असल्याचे बोलले जाते आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध