Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

बाभळे फाटा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि अमली पदार्थाचा व्यापार ! योग्य चौकशी केल्यास हाती लागू शकते,अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट !



शिंदखेडा शिंदखेडा प्रतिनिधी :- तालुक्यातील बाभळे फाटा येथिल अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्यांचारातील अजून बरेच काही माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती लागलेली असून यात मुख्य आरोपी जयपाल व त्यांचे इतर साथीदार अजूनही फ़रार आहे. एका 24 वर्षीय मुलीच्या मदतीने 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले, यासाठी वापरण्यात आलेली थार गाडी नेमकी कोणाची ? ती का जप्त करण्यात आलेली नाही ? त्या गाडीचा ड्रायव्हर कोण ? नेमके पीडीत मुलीवर अत्याचार करण्यात आले ते गोडाऊन कुणाचे ? व ते गोडाऊन यासाठी वापरण्याची परवानगी दिली कॊणी व कशी ? मग आजपर्यत अशा किती मुलींचे अपहरण करण्यात आले ? त्यांचे नमके काय झाले ? याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. 

अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर 3-4 नराधमांनी केलेला पाषवी अत्याचार केलेत, व त्यासाठी वापरण्यात आलेले अमली पदार्थ आणला कोणी,  अमली पदार्थ घेण्यासाठी नाशिक येथे प्रवास ही सर्व बाबीचा आढावा घेतल्यास, आणि या बाबीची पोलिस प्रशासनाने कसून चौकशी घेतल्यास अमली पदार्थांची तस्करी करणारी एक मोठी श्रृंखला/ठोळी हाती लागू शकते. तसेच त्यांची तस्करी कोठपर्यत केली जात होती? यात काही शाळकरी व कॅ|लेजचे मुली-मुले देखील आहेत काय ? कारण धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी शिक्षणाचे मोठे हब आहेत.व याचे धागे-दोरे तिथपर्यत तर नाहीत ना ? अशी शंका काही पालक वर्गाने निर्माण केलेली आहे. धास्तावलेल्या पालक वर्गांची धास्ती दुर करण्यासाठी याचा शोध घेणे गरजेचे आहे.

तसेच महाराष्ट्र राज्याच्या मध्यप्रदेश व गुजरात या दोन राज्याच्या सिमा जवळ असून यात सदर राज्यातील गुन्हेगारी टोळीचा देखील समावेश असू शकतो. यातील संबंधीत जागा मालक यांने अशा गैरव्यवसायासाठी जागा का दिली ? त्यात त्याचा किती हिस्सा आहे ? एम.पी.(सेंदवा) वाले मॅकिनिकल ईस्माईल हाजी व गुजरात वाले ऐजाज भाई व त्यांचे इतर साथीदार नेमके कुठे लपून बसलेत? यांना पोलिस प्रशासन शोधून बाहेर काढणार का? यांच्याकडून देखील मोठी माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे ह्या हारामखोराच्या मुसक्या आवळून जेरबंद करणे आवश्यक आहे.   

 
(वाचा पुढील अंकात….मुख्य अरोपींना वाचवण्यासाठी प्रयन्त करणारा…किंग दादा कोण ?)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध