Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्याचा आ.मंजुळा गावित यांच्या हस्ते आखाडे गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन
साक्री तालुक्याचा आ.मंजुळा गावित यांच्या हस्ते आखाडे गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन
साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावित यांच्या अथक प्रयत्नातून साक्री तालुका,आणि मौजे आखाडे गावाच्या विकासाचा धूमधडाका सुरू आहे.
गावाच्या सरपंच सौ.सारिका ठाकरे,व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भार्गव,महेश राणे,आणि माजी सरपंच शिवलाल ठाकरे यांनी गावाची व्याप्ती आणि गरज ओळखून आमदार मंजुळा गावित यांच्याकडे मागणी केल्यानुसार,आखाडे गाव विकासासाठी,आमदार निधीतून विविध विकासकामांसाठी एकूण पस्तीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.त्यातून १४ लक्ष रुपये खर्चातून निर्माण करण्यात आलेले,मौजे आखाडे गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत, आणि १४ लक्ष रुपये खर्चातून सार्वजनिक सामाजिक सभागृहाच्या नवीन दोघं वास्तूचे कामांच्या एकूण अष्ठावीस लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.आणि निर्माणाधीन सात लक्ष रुपये खर्चातून नियोजित गाव दरवाजाचे बांधकाम,तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या
नवीन इमारत बांधकाम शुभारंभ आणि आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत श्री.भगवान एकलव्य यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन, दि.५ ऑक्टोंबर २०२४ रोजी आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सर्वप्रथम आमदार सौ मंजुळा गावित यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे गावातील सुहासिनीने औक्षण करून स्वागत केले.यावेळी कार्यक्रमात,आमदार सौ.मंजुळाताई गावीत यांनी आखाडे गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, मागीलला काळात,शिवसेना उपजिल्हा संघटक श्री.शिवलाल ठाकरे यांच्या सुचनेवरून,
प्रमुख छोटूराम तोरवणे,सरपंच सौ.
आखाडे ते वाझदरा यास जोडणारा रोहीणी नदीवरील पुल एक कोटी साठ लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.त्यामुळे त्यामार्गामुळे वेळेची आणि उर्जेची बचत झाली आहे. साक्री तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच मी प्रयत्नशील राहील,असे आश्वासन गावकऱ्यांना आमदार सौ.गावीत यांनी दिले.याप्रसंगी आमदार सौ.गावीत यांचे सुपुत्र ईंजि.सागर गावीत,अशोक मुलगे,राजेश बागुल,भाजपचे जेष्ठ नेते डॉ.हरीभाऊ ठाकरे, शिवाजी ठाकरे,साक्री शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे,तालुका शेतकरी आघाडी
सारिकाताई ठाकरे,उपसरपंच श्रीमती राजी ठाकरे इत्यादी नमूद गणमान्य व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन,माजी सरपंच तथा शिवसेना उपजिल्हा संघटक शिवलाल ठाकरे,सन्माननीय ग्रामपंचायत सदस्या सौ.पूजा माळचे,संगीता ठाकरे प्रतिभा कापडे,दाजभाऊ पिंपळे,भुऱ्या यादव मोरे,दगडू ठाकरे,विजय ठाकरे,हरी मोरे,आखाडे गावाचे पोलीस पाटील योगेश खैरनार,विवीध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कैलास ठाकरे,व्हाईस चेरमन वकिल मोहिते,सचिव संदीप ठाकरे,व सर्व संचालक रावसाहेब ठाकरे,मुरलीधर ठाकरे,साहेबराव धोबी, सुरेश खैरनार,विजय वाघ,किशोर कापडे,पत्रकार विकास महिरे,जोती भवरे,निलेश महिरे निलेश ठाकरे,किशोर ठाकरे,मुरलीधर ठाकरे, दिनेश मोहिते,गणेश ठाकरे,सुरेश माळचे,रमेश रेंडाईत,महारु गायकवाड,लक्ष्मण पिंपळे, आणि पोलीस मित्र संघटना आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.यावेळी आखाडे गावातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा