Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
प्रा. विवेक कोरे यांचा राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक...
प्रा. विवेक कोरे यांचा राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक...
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये, श्री तुळजाभवानी ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, तुळजापूर येथील प्रा.विवेक कोरे यांनी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातील शिक्षकांनी सहा गटांमध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ सादर केले होते.
पारितोषिक वितरण दि.२९ सप्टेंबर रोजी महात्मा फुले सभागृह, SCERT पुणे येथे झाले.पारितोषिक वितरण प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री मा. दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. आय. ए. कुंदन, मा. सुरज मांढरे आयुक्त (शिक्षण) तसेच SCERT संचालक मा. राहुल रेखावार यांचे हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये प्रा.कोरे यांनी इंग्रजी विषयातील इयत्ता ६ ते ८ या गटासाठी तयार केलेल्या व्हिडिओसाठी हे पारितोषिक पटकावले. प्रा.कोरे यांनी या स्पर्धेसाठी सहापैकी पाच गटातील पाच शैक्षणिक व्हिडिओ तयार करून पाठवले होते, त्यापैकी चार व्हिडिओंना पारितोषिके मिळाली आहेत. राज्यस्तरावर एका व्हिडिओला प्रथम क्रमांक मिळाला तर तीन व्हिडिओंना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक, आणि एका व्हिडिओला तृतीय क्रमांक मिळाला. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांक पारितोषिकाचे स्वरूप ५०,००० रुपये रोख, प्रमाणपत्र, मेडल, आणि ट्रॉफी असे आहे.
प्रा. विवेक कोरे यांना मिळालेल्या या यशाबद्दल धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगीताई गावडे, मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, आय.टी विभागप्रमुख डॉ शोभा मिसाळ, डॉ. शरीफ शेख, कॉलेजचे प्राचार्य शशिकांत दोंड यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
प्रा. विवेक कोरे यांच्या या यशामुळे शिक्षकांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीच्या क्षेत्रात कसे सर्जनशीलतेने योगदान देता येते, याचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांसाठी संकल्पनांचे आकलन सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे हे शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे ठरते.
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्ययन सुकर - प्रा. विवेक कोरे
"अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अध्ययन निष्पत्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. किती शिकवले? यापेक्षा विद्यार्थ्यांना किती समजले? हे अधिक महत्त्वाचे असते. शिक्षणाचे उद्दिष्ट संकल्पनांचे सहज, स्पष्ट आणि ठोस आकलन आहे. त्यासाठी घटकांची सखोल माहिती संकलित करून त्याचे आकर्षक आणि प्रभावी व्हिडिओ तयार करणे खूप फायदेशीर ठरते. विद्यार्थ्यांना अध्ययन सुलभ व्हावे आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, म्हणून मी चार-पाच वर्षांपूर्वीच शिक्षणशास्त्रातील विविध व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओंचा लाभ राज्यातील डी.एड व बी. एड विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होत आहे. खास स्पर्धेसाठी तयार केलेल्या व्हिडिओंना मानाचे पारितोषिक मिळाले आहे.माझ्या मते, विद्यार्थ्यांचे अध्ययन सुकर होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग एक प्रभावी साधन ठरले आहे, आणि याचा अधिकाधिक वापर शिक्षण प्रक्रियेत केला जावा." यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा