Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत साक्री तालुक्यातील एक हजार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध आमदार सौ.मंजुळाताई गावीत
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत साक्री तालुक्यातील एक हजार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध आमदार सौ.मंजुळाताई गावीत
धुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या कृपेने साक्री तालुक्यातील जि.प.मराठी शाळा,माध्यमिक शाळा,आश्रमशाळा येथे प्राथमिक शिक्षक तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बहुउद्देशिय कर्मचारी ग्रामपंचायतीत ग्रामदूत पशुवैद्यकीय दवाखान्यात साक्री तालुक्यातील एकूण १ हजार युवक-युवतींना आज पिंपळनेर येथील कृष्णा रिसोर्ट अॅड एखंडे लॉन्स येथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.या सर्व उमेदवारांना तालुक्याचे आमदार सौ.मंजुळाताई गावीत
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्य
यांची माहिती यांच्या हस्ते तसेच जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवडे साहेब उपविभागीय अधिकारी श्री कुवर साहेब,तहसिलदार साक्री साहेबराव सोनवणे गटविकास अधिकारी साक्री श्री सोनवणे साहेब प्रशिक्षणाधिकारी श्री सुर्यवंशी,यांच्या हस्ते आदेश देण्यात
आले.अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.सदस्य,जि.प.सदस्या सुमित्रा गांगुर्डे, शिवसेना तालुका उपप्रमुख,बबन चौधरी,तसेच उप तालुकाप्रमुख उपस्थित होते.या योजने अंतर्गत इ.१२ वी पास असलेल्या उमेदवारांना सहा हजार रुपये मानधन,आय टी
आय,पदवीकाधारक उमेदवारांना ८ हजार रुपये मानधन तर पदवीधारक उमेदवारांना १० हजार रुपये मानधन देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले.साक्री तालुक्यातील तरुणांना १ हजार उमेदवारांना मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे उपसिथती युवक आणि युवतींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल साक्री तालुका चा आमदार सौ.मंजुळाताई गावीत यांचे उपस्थीत उमेदवारांनी जाहीर आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजीत बागुल यांनी विशेष परीश्रम घेतले.अजूनही ४००- ५०० उमेदवारांना अशी संधी लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल असे आयोजकांनी आश्वासित केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा