Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

आ.अनिल गोटेंच्या हाती उध्दव ठाकरेंनी बांधले शिवबंधन. धुळ्यावर भगवा फडकवा एबी फार्म देत उमेदवारी केली फायनल



धुळे - धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत हातात भगवा झेंडा घेवून शिवसेना उबाठा पक्षात जाहिर प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी अनिल गोटे यांची उमेदवारी देखील निश्‍चीत करण्यात आली असून त्यांना सेनेचा एबी फार्म देखील देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी आपणच करणार असा दावा करीत अनिल गोटे यांनी दोन दिवसांपुर्वीच आपणास शिवसेना नेते खा.संजय राऊत यंानी मुंबई येथे पोहचण्यास सांगितले असून मातोश्रीवर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश आणि उमेदवारी निश्‍चीत केली जाणार असल्याचे म्हटले होते.त्यानुसार आज दि.२४ रोजी दुपारी माजी आ.अनिल गोटे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते अशोक धात्रक आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

तसेच अनिल गोटे यांचे कट्टर समर्थक दिलीप सांळुके,सलीम लंबू, दिपक जाधव,डॉ.अनिल पाटील,खलील अन्सारी,अमीन मन्यार,मकसुद अहेमद,रघुभाई बुलेटवाले,प्रशांत भदाणे,विलास लंवादे,डॉ,संजय पिंगळे, सोमनाथ चौधरी,बाळू शेंडगे आदी.उपस्थित होते.

शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केल्यानंतर अनिल गोटे यांना शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील फायनल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या वतीने अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी उद्याप जाहिर झाली नसली तरी अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे यांचा एबी फॉर्म दाखवणारे एक छायाचित्र देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध