Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून आ.सौ मंजुळाताई गावित यांना भाऊबीजेची भेट.



उद्या गुरुवार रोजी हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर करणार
साक्री विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते.उमेदवारी कोणाला मिळेल.परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणी सौ मंजुळाताई गावित यांना दिवाळी व भाऊबीजेचे अनोखे गिफ्ट देऊन संपूर्ण तालुक्याला एक आनंदाची वार्ता देऊन आश्चर्यचकित केले.मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला सौ मंजुळाताई गावित २४ ऑक्टोबर रोजी हजारोच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी
माहिती डॉक्टर तुळशीराम गावित यांनी दिली. सौ मंजुळा ताई गावित यांना साक्री
विधानसभेचे तिकीट मिळाल्यामुळे मातोश्री ग्रुपने फटाक्यांचे आतिशबाजी करत
आनंद उत्सव साजरा केला.साक्री तालुक्यात आता बहुरंगी लढत पाहायला मिळेल.या लढतीत कोण बाजी मारेल याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून आहे.सौ मंजुळ ताई गावित यांच्याकडे नवयुवक तरुण व तालुक्यातील ग्रामपंचायत यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे त्यांचे पारडेआजच्या स्थितीला जड आहे असे म्हणायला काही हरकत नाही.असेच लाडक्या बहिणी आपल्या ताईंना किती मदत करतात यावर सर्व गणित अवलंबून आहे.सौ मंजुळाताई गावित यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली तर साक्री तालुक्याला लाल दिव्याची गाडी नक्कीच मिळेल यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध