Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४
पाच वर्षात अनिल पाटलांनी शाश्वत विकास केला- भाजप तालुका प्रमुख हिरालाल पाटील
अमळनेर प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात पातोंडा दहिवद जिल्हा परिषदेच्या गटात शाश्वत असा विकास मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केल्याने या गटात विकासाची भूख भागविणारा आमदार म्हणून जनतेत त्यांची ओळख निर्माण झाली असल्याची भावना भाजपा चे तालुकाध्यक्ष तथा दहिवद खुर्द गावाचे माजी सरपंच हिरालाल पाटील यांनी दिली.
यासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधताना हिरालाल पाटील म्हणाले की या गटातील जनता महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या सोबत आहेच परंतु त्यांच्या काळात गेल्या काही वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक विकास झाल्याने या विकासाचे देखील आम्ही समर्थन करीत आहोत.
या गटातून मतदानरुपी झालेल्या या प्रेमाची परतफेड अनिल दादांनी या गटात विकास कामांचा प्रचंड वर्षाव करून केली आहे.येथील लोक असं म्हणतात की स्वातंत्र्य काळानंतर गेल्या पाच वर्षात या गटात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.या गटात अनिल दादांनी जलजिवन मिशन अंतर्गत अनेक गावात कोट्यावधी निधी देऊन नवीन पाणीपुरवठा योजना दिल्याने ही गावे टंचाई मुक्त होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे ही अनमोल अशी भेटच आहे.या गटातील मुख्य मार्ग म्हणजे जलगावं,धरणगाव, म्हस्ले,टा करखेडा,अमळनेर मार्ग,हा रस्ता त्यांनी नूतनकरण करून दिल्याने शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसयास चालना मिळून दळणवळनास गती मिळाली.या गटात दहिवद,पातोंडा आणि अमळगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे,एकट्या दहिवद गावात तब्बल साडे पाच कोटींची विकासकामे अनिल दादांनी दिली आहेत.यातून रस्ता काँक्रीटीकरणं,बौद्ध विहार,गाव दरवाजा व सुशोभीकरण सारखी कामे झालीत.पातोंडा गावात सुमारे दोन कोटींच्या वर निधी दिल्याने यातून महिजी देवी देवस्थान साठी भक्तनिवास व स्वच्छता गृहे तसेच पाईप मोरी,गाव दरवाजा,शेत रस्ते,रस्ता काँक्रीटीकरणं,सामाजिक सभागृह उभारले गेले.नगावं खुर्द येथे सव्वा कोटी निधीतून 3 सिमेंट बंधारे टाकण्यात आल्याने शेतकरी राजासाठी पाणी अडविण्याची सोय झाली असून अजून तीन बंधाऱ्यांच्या निविदा प्रलंबित आहेत.अमळगाव येथेही भरघोस विकास कामे झाली आहेत. खरे पाहता या गटातील कोणत्याही गावाला निधीची कमतरता न भासू देता प्रत्येक लहान मोठ्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न अनिल दादांनी केला असेही हिरालाल पाटील यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा